• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

‘खो खो’चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार

by pravin
August 27, 2022
in जिल्हा, पुरस्कार, बातम्या
Reading Time: 1 min read
'खो खो'चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे खेळासाठी योगदान देणाऱ्या खेळाडु, क्रीडा शिक्षक आणि संघटकांचा गौरव करण्यात येतो. यंदाचा संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार खो खो खेळाचे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा रविवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे ओलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी दत्तू भोकनळ आणि यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय खेळाडूंचा देखील गौरव होणार आहे. पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे:

आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार –

डॉ. निलेश गाडेकर (सोयगाव), निलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), निलेश माने (गंगापूर).

सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू :

अदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्य पदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई अथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), संदीप गुरमे (आयर्नमॅन) यांच्यासह विविध खेळांतील राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांचा देखील सत्कार केला जाणार आहे.

औरंगाबाद ऑलिम्पिक अस्सोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा यावर्षी, २८ ऑगस्ट रविवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे सकाळी ९:३० वाजता आयोजित केलेला असून सर्व पुरस्कार्थी खेळाडूंनी आणि विविध खेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या खेळाच्या खेळाडूंना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे तसेच ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार्थी दत्तू भोकनाल यांच्या शुभहस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंकज भारसाखळे

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी आदींनी केले आहे.

Tags: Aurangabad District Olympic AssociationAurangabad District Olympic Association Award NewsLatest sports newslatest sports news marathisenior organizer of 'Kho Kho'Sports Award News Sports DayThis year's Lifetime Achievement Award to Ramesh Bhandari
ShareTweetSend
Next Post
गरज पडल्यास जमीन विकत घेऊ, पण क्रीडा विद्यापीठ करू: अतुल सावे

गरज पडल्यास जमीन विकत घेऊ, पण क्रीडा विद्यापीठ करू: अतुल सावे

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.