• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 16, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

by pravin
July 15, 2026
in जिल्हास्तरीय, फुटबॉल, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी   : जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा 2026-27 ला आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बेगमपूरा येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यात 15 वर्षांखालील मुलांच्या गटातील स्पर्धांना सुरुवात झाली असून या गटात 17 संघांनी सहभाग नोंदविला आहे.

सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या पुरस्कृत या प्रतिष्ठित स्पर्धेचे राज्यभर दरवर्षी आयोजन केले जाते. यावर्षीच्या 65 व्या सुब्रोतो मुखर्जी इंटरनॅशनल फुटबॉल कप स्पर्धा 18 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार असून महाराष्ट्राचा विजेता संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गोरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी मुकूंद वाडकर यांनी टॉस करून खेळाडूंचा परिचय घेत स्पर्धेची अधिकृत सुरुवात केली.
यावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक आर. एस. पटेकर, प्रा. सुनील एन. गायसमुद्रे, प्रा. कुणाल साळवे, प्रा. राहुल आहिरे, क्रीडा अधिकारी डॉ. रेखा परदेशी, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे आणि सचिन बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे वेळापत्रक
15 वर्षांखालील मुले: 15 ते 16 जुलै 2026
17 वर्षांखालील मुले: 17 ते 18 जुलै 2026
17 वर्षांखालील मुली: 20 ते 21 जुलै 2026
सर्व स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

पहिल्या फेरीचे निकाल (15 वर्षांखालील मुले)
पद्मश्री शंकर बापू आपेगावकर स्कूल ने पल्स अकॅडमीवर 4-2 (पेनल्टी शूटआऊट) ने विजय मिळवला.

फाउंटेन हेड वोकहार्ड ग्लोबल स्कूल ने महाराष्ट्र पब्लिक स्कूल, दौलताबादवर 2-0 अशी मात केली.
गायकवाड ग्लोबल स्कूल ने राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कूलचा 3-0 असा पराभव केला.
डिफेन्स करिअर अकॅडमी, गंगापूर ने टेंडर केअर होम (टीसीएच), आडगाववर 7-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
पोडार स्कूल, वाळूज ने न्यू बिगिनिंग स्कूलवर 3-0 अशी मात केली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित संघटनांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मुकूंद वाडकर यांनी दिली.

ShareTweetSend
Next Post

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

ताज्या बातम्या

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

स्वच्छ खेळासाठी NADA India चे आवाहन; संशयास्पद डोपिंगची गोपनीय तक्रार करा

स्वच्छ खेळासाठी NADA India चे आवाहन; संशयास्पद डोपिंगची गोपनीय तक्रार करा

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.