• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

गरज पडल्यास जमीन विकत घेऊ, पण क्रीडा विद्यापीठ करू: अतुल सावे

by pravin
August 29, 2022
in जिल्हा, पुरस्कार
Reading Time: 1 min read
गरज पडल्यास जमीन विकत घेऊ, पण क्रीडा विद्यापीठ करू: अतुल सावे

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय खेळाडूं व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारार्थीं सोबत सहकारमंत्री अतुल सावे, ऑलिंपियन दत्तू भोकनळ, रमेश भंडारी, पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, पोलीस निरीक्षक सुरेश गिरमे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेकर घुगे, अब्दुल कादिर आदी.

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): क्रीडा विद्यापीठ ही मराठवाडा भागाची गरज आहे. त्यामुळे सरकारी जमीन मिळाली तर ठीक अन्यथा जमीन विकत घेऊ पण क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद मध्ये करू अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ४५३ खेळाडू, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव सावे आणि ओलिम्पियन दत्तू भोकनळ यांच्या हस्ते करण्यात आला.

मेजर ध्यानचंद यांची जयंती तथा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यांचा गौरव करण्यात आला. संत एकनाथ रंग मंदिरात रविवारी पार पडलेल्या खेळाडूंच्या या सत्कार सोहळ्याला राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, ऑलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी दत्तू भोकनळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

खो-खो खेळाच्या उद्धारासाठी तब्बल पन्नास वर्षे अविरत कार्य करणारे रमेश भंडारी यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, डॉ.उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रीडा विद्यापीठ ही औरंगाबाद तथा मराठवाड्याची गरज असताना हे विद्यापीठ अजून आपल्या भागाला मिळाले नाही. त्यामुळे सरकारी जमीन घेऊन हे विद्यापीठ करू. सरकारी जागा न मिळाल्यास जमीन विकत घेऊ पण हे विद्यापीठ करू अशी अशी घोषणा राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज या कार्यक्रमात केली. बालेवाडीच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागाला ही सुविधा मिळालीच पाहिजे. या क्रीडा विद्यापीठाचे लवकरच भूमिपूजन केले जाईल, असे ते पुढे म्हणाले.

दत्तू भोकनळ यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, अनेकदा आपण मेहनातीकडे पूर्ण लक्ष देत नाही. मात्र आपल्या भोवती असलेल्या सुविधांकडे जास्त पाहतो. असे न करता आपल्या मेहनतीकडे अधिक लक्ष दिले तर खेळाडूला त्याचा फायदाच होतो.

डॉ. निलेश गाडेकर (सोयगाव), निलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), निलेश माने (गंगापूर) यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू : अदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्य पदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई अथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), आयर्नमॅन संदीप गुरमे (युरोपिअन चॅम्पिअनशिप ) यांच्यासह विविध खेळांतील ४५३ राष्ट्रीय खेळाडू, ५७ क्रीडा मार्गदर्शकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दिनेश वंजारे, विश्वास जोशी, डॉ.अब्दुल कादिर, डॉ.दयानंद कांबळे, डॉ.संदीप जगताप, अमृत बिऱ्हाडे आदींनी परिश्रम घेतले.

Tags: Aurangabad District Olympic Association Award NewsLatest sports newslatest sports news marathiMarathi sports newsMarathi sports news Sports DayMLA Atul Save
ShareTweetSend
Next Post
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.