• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे सोलापुरात शनिवारी आयोजन

by pravin
March 26, 2026
in कुस्ती, महिला महाराष्ट्र केसरी
Reading Time: 1 min read
चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे सोलापुरात शनिवारी आयोजन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर: कै. सिध्दाराम साखरे यांच्या स्मरणार्थ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ मार्च रोजी हरिभाई देवकरण प्रशालेत चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निर्झरा केअर फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी दिली. याचवेळी विविध गटांतील पुरुष कुस्ती स्पर्धाही याच वेळी पार पडणार आहेत.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके, जिल्हाध्यक्ष अस्लम काझी यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार सर्वश्री देवेंद्र कोठे, सुभाष देशमुख, दिलीपराव सोपल, बाबासाहेब देशमुख, राजू खरे, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, नारायण पाटील, उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह बाजार समिती सभापती दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेंजयराजे भोसले, शहाजी पवार, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एस. राजकुमार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हेही उपस्थित राहणार आहेत.

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खुल्या वजन गटासह ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२ अशा विविध वजन गटांमध्ये सामने रंगणार आहेत. विजेत्यांना कार आणि उपविजेत्यास बुलेट प्रदान करण्यात येणार आहे. पुरुष गटात २५ ते ३०, ३१ ते ३५, ३६ ते ४०, ४१ ते ४५, ४६ ते ५०, ५१ ते ५५, ५६ ते ६०, ६१ ते ६५, ६६ ते ७०, ७१ ते ७५, ७६ ते ८०, ८१ ते ९० आणि ९१ ते ११० किलो तसेच खुल्या गटात स्पर्धा होणार आहेत. पत्रकार परिषदेस केदारलिंग विभुते, सोमनाथ पटणे, सत्येन जाधव, भरत मेकाले, मनोज घोडके, लक्ष्मण सरवदे आदी उपस्थित होते.

Tags: KushtiMaharashtra KesariSolapur NewsSports NewsWomen Wrestlingwrestling
ShareTweetSend
Next Post
महिला महाराष्ट्र केसरी-२०२६;अमृता आणि अपेक्षाकडून जेतेपदासाठी दावेदार!

महिला महाराष्ट्र केसरी-२०२६;अमृता आणि अपेक्षाकडून जेतेपदासाठी दावेदार!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.