• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महिला महाराष्ट्र केसरी-२०२६;अमृता आणि अपेक्षाकडून जेतेपदासाठी दावेदार!

गतविजेत्या भाग्यश्री फंडचे मत

by pravin
March 28, 2026
in कुस्ती, महिला महाराष्ट्र केसरी
Reading Time: 1 min read
महिला महाराष्ट्र केसरी-२०२६;अमृता आणि अपेक्षाकडून जेतेपदासाठी दावेदार!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर: महिला महाराष्ट्र केसरी होण्यासाठी आता स्पर्धात्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमृता पुजारी आणि अपेक्षा पाटील वैष्णवी पाटील या यंदाच्या किताबावर दावेदारी करू शकतील, असे मत याआधीच्या पहिल्या तिन्ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे जेतेपदाचे किताब जिंकणाऱ्या भाग्यश्री फंडने व्यक्त केले.

गतवेळच्या महाराष्ट्र केसरी जेतेपदाच्या लढतीत भाग्यश्रीने अमृताला पराभूत करीत विजेतेपद मिळवले होते. पण यंदा चौथ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती पुरस्कारावर दावा करणार नसल्याचे भाग्यश्रीने स्पष्ट केले. यासंदर्भात भाग्यश्री म्हणाली, “माझा सध्या वजनी गट ५९ ते ६२ किलो आहे. महाराष्ट्र केसरी गटासाठी ६५ ते ७६ किलो वजनी गट पात्र ठरतो. इतके वजन वाढवणे आता अवघड असल्यामुळेच मी यावर्षी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.”

महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठी तू मागील तीन वर्षे कशी मेहनत घेतलीस, या प्रश्नाला उत्तर देताना भाग्यश्री म्हणाली, “ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताबावर वर्चस्व राखणे, हे मुळीच सोप्पे नव्हते. गेली तीन वर्षे मी कसून मेहनत घेतली. वजन वाढवणे, विविध डाव-प्रतिडावांचा सराव करणे, लढतीचा सराव करणे याचा यात समावेश होता.”
“पुरुषांमध्ये महाराष्ट्र केसरी झाल्यावर शासकीय नोकरी मिळते. मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाली. पण अजूनही मला नोकरी नाही. आम्ही बरेच प्रयत्न केले. पण ते यशस्वी ठरले नाहीत,” अशी खंत भाग्यश्रीने प्रकट केली.

Tags: Indian Women WrestlersMaharashtra Kesari WomenMaharashtra Sports UpdateMahila Kushti SpardhaSolapur Newssports news marathiWomen Wrestling IndiaWrestling Competition 2026
ShareTweetSend
Next Post
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पदाधिकारी, पंच जाहीर

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पदाधिकारी, पंच जाहीर

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.