• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

तलवारबाजीच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहात सुरुवात

by pravin
June 29, 2026
in जिल्हास्तरीय, तलवारबाजी
Reading Time: 1 min read
तलवारबाजीच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला उत्साहात सुरुवात
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 नाशिक | प्रतिनिधी

ऑलिंपिक सप्ताहानिमित्त कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेला रविवारी (२८ जून) उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील युवा तलवारबाजांनी सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली.

स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शरयू पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सरचिटणीस राहुल वाघमारे होते.

यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, तलवारबाजी राज्य संघटनेचे सहसचिव अविनाश दुधाणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे तसेच स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना शरयू पाटील म्हणाल्या, “अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी भक्कम तयारी करण्याची संधी मिळते. प्रत्येक खेळाडूने या संधीचे सोने करत सातत्याने मेहनत घेतली पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल पडवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसाद परदेशी यांनी केले.

स्पर्धेचे निकाल

ईपी (मुले)

  • प्रथम : विराल मस्के
  • द्वितीय : आदित्य बनगर
  • तृतीय : अर्णव बनगर, विराज गोसावी

फॉइल (मुले)

  • प्रथम : प्रणव डेरले
  • द्वितीय : चिरायू पाटील
  • तृतीय : रियांश कराड, साहिल कांदळकर

सॅबर (मुले)

  • प्रथम : परदेशी
  • द्वितीय : आदित्य पाटील
  • तृतीय : संकेत पाटील, कार्तिक वराडे

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी युवा तलवारबाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. आगामी फेऱ्यांमध्ये अधिक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असल्याने स्पर्धेबाबत खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

Tags: fencingFencing ChampionshipKhel Sanskriti FoundationOlympic Week 2026sports news marathiSports Panoramaछत्रपती संभाजीनगरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धाजिल्हा तलवारबाजी स्पर्धातलवारबाजीमहाराष्ट्र तलवारबाजीयुवा खेळाडूशरयू पाटीलशिवछत्रपती पुरस्कार
ShareTweetSend
Next Post
LA28 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा रंगतदार पुनरागमन

LA28 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा रंगतदार पुनरागमन

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.