• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 18, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 2026-27 चे संभाव्य यजमानपद जाहीर; महाराष्ट्राला पाच स्पर्धांचे आयोजन

by pravin
July 1, 2026
in अन्य खेळ, खेळ ( वैयक्तिक), खेळ ( सांघिक ), बातम्या, राष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे 2026-27 चे संभाव्य यजमानपद जाहीर; महाराष्ट्राला पाच स्पर्धांचे आयोजन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

स्पोर्ट्स पॅनोरमा | वृत्तसेवा

 शालेय क्रीडा महासंघाने (SGFI) 2026-27 या सत्रातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या संभाव्य यजमान राज्यांची आणि स्पर्धा स्थळांची यादी जाहीर केली आहे. या कॅलेंडरनुसार देशभरातील विविध राज्यांमध्ये 115 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होणार असून महाराष्ट्राला पाच महत्त्वाच्या स्पर्धांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रात यू-19 बेसबॉल स्पर्धा जळगाव येथे, रोड सायकलिंग स्पर्धा पुणे येथे, यू-17 मुलांची बास्केटबॉल स्पर्धा वारणानगर येथे, यू-19 मुलांची कबड्डी स्पर्धा नांदेड येथे तसेच यू-14 व्हॉलीबॉल स्पर्धा शिर्डी (अहिल्यानगर) येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय यू-19 वॉटर पोलो स्पर्धेचे यजमानपदही महाराष्ट्राकडे देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन (SGFI 2026-27)

क्रीडा प्रकारवयोगटयजमान शहरराज्य
बेसबॉलU-19जळगावमहाराष्ट्र
सायकलिंग (रोड)U-14, U-17, U-19पुणेमहाराष्ट्र
बास्केटबॉलU-17 मुलेवारणानगरमहाराष्ट्र
कबड्डीU-19 मुलेनांदेडमहाराष्ट्र
व्हॉलीबॉलU-14 मुले व मुलीशिर्डी (अहिल्यानगर)महाराष्ट्र
वॉटर पोलोU-19 मुलेमहाराष्ट्र (स्थळ निश्चित होणे बाकी)महाराष्ट्र

या कॅलेंडरमध्ये अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, बॉक्सिंग, जलतरण, टेबल टेनिस, शूटिंग, जिम्नॅस्टिक्स, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, योगासन, वुशू, कराटे, मल्लखांब यांसह विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. बहुतांश स्पर्धा नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजन असून काही स्पर्धांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित स्पर्धांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

SGFI National School Games 2026-27 : संपूर्ण राष्ट्रीय क्रीडा कॅलेंडर

शालेय खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी देणाऱ्या या स्पर्धांमुळे विविध राज्यांतील क्रीडा पायाभूत सुविधांनाही चालना मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांना यजमानपद मिळाल्याने राज्यातील शालेय क्रीडा चळवळीला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ShareTweetSend
Next Post
विश्वचषकात बालोगनचा ऐतिहासिक विक्रम; गोलही केला आणि रेड कार्डही, खास यादीत चौथा खेळाडू

विश्वचषकात बालोगनचा ऐतिहासिक विक्रम; गोलही केला आणि रेड कार्डही, खास यादीत चौथा खेळाडू

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.