• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी!

उत्कंठा शिगेला; महाराष्ट्राचे लक्ष सोलापूरकडे

by pravin
March 29, 2026
in कुस्ती, महिला महाराष्ट्र केसरी
Reading Time: 1 min read
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र केसरी ७६ किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली. मध्यंतरास सोनाली २-० गुणाने आघाडीवर होती. त्यानंतर मात्र विजेतेपदाची दावेदार असलेल्या अपेक्षाने जोरदार मुसंडी मारत ६-३ गुणाने कुस्ती जिंकली. शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत ५३ किलो गटात सोलापूरची शिवानी करचे हिने पुण्याच्या अवंती रानवडे हिला ६-५ असे हरवले.

दुसऱ्या फेरीत पोहोचलेले गटनिहाय मल्ल :
५० किलो : तेजा मदने (छ. संभाजीनगर), तृप्ती गुरव (कोल्हापूर), आकांशा जाधव, अर्पिता गोळे (पुणे), भाग्यश्री मासुळे (धुळे), गौरी पाटील (कोल्हापूर), अनुष्का हासपे (सातारा), कोमल पटेल (ठाणे).
५३ किलो : श्रावणी लव्हटे (कोल्हापूर), दिव्या धावडे (अहिल्यानगर), सोनामिका पाटील (जळगाव), राजनंदिनी रनवरे (सातारा), मधुरा वाईंगडे (कोल्हापूर), तुळशी पाथरे (नाशिक शहर).
५५ किलो : समृद्धी निलवे (मुंबई उपनगर ).
५७ किलो : सलोनी खोपडे (पुणे), सिमरन कोरी (मुंबई उपनगर), तन्वी मगदूम (कोल्हापूर).
५९ किलो : धनश्री फंड (अहिल्यानगर), निर्मिती मुऱ्हे (पिंपरी चिंचवड), अमेघां घरत (रायगड).
६२ किलो : प्रगती गायकवाड (पिंपरी चिंचवड), संस्कृती शिरसाट (नाशिक), राधिका ढेरे, राधिका ढेरे (कोल्हापूर).
६५ किलो : दिव्या कुंभार,विशाखा चव्हाण ( पुणे ), अश्विनी गर्जे (बीड).
६८ किलो : शिवानी मेटकर (कोल्हापूर), आराधना नाईक (सांगली).
७२ किलो : सावरी सातकर (पुणे), वेदांतिका पवार (सातारा).
७६ किलो महाराष्ट्र केसरी गट : वेदिका ससाणे, सृष्टी भोसले (कोल्हापूर), प्रतीक्षा बागडी (सांगली).

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पहिली मुख्य लढत सांगलीची अपेक्षा पाटील आणि अहिल्यानगरची सोनाली पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये अपेक्षा पाटील हिने सोनाली हिचा आठ विरुध्द दोन गुणांनी पराभव केला. दुसऱ्या लढतीत सोलापूरच्या श्रेया कलागते हिला कोल्हापूरच्या वेदिका ससाणे हिने पाच विरुध्द आठ गुणाने हरवले. तिसऱ्या लढतीत धुळ्याच्या कामिनी देविकार हिला सांगलीच्या प्रतिक्षा बागडी हिने चार शून्यने हरवले तर चौथ्या लढतीत पुण्याच्या श्रृतिका पवार हिला कोल्हापूरच्या श्रृष्टी भोसले हिने आठ विरुध्द तीन गुणांनी हरवले. पाचव्या लढतीत संभाजीनगरच्या अनुराधा चव्हाण हिचा पुण्याच्या रोशनी बोडके हिने पाच विरुध्द सहा गुणांनी पराभव केला.

पहिल्या दिवशी पार पडल्या 150 कुस्त्या
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध वजनी गटात 150 कुस्त्या पार पडल्या. 50, 53, 57, 59, 62, 65, 68, 72 आणि 76 या वजनी गटात सरासरी 15 कुस्त्या झाल्या. या कुस्त्यांसाठी तीन मॅटची मैदाने तयार करण्यात आली होती. यासाठी दहा महिला पंच आणि दहा पुरुष पंच कार्यरत होते.

आज प्रथम सेमी फायनल अमृता पुजारी कोल्हापूर विरुद्ध सृष्टी भोसले, मुरगुंडं कोल्हापूर व अपेक्षा पाटील विरुद्ध वेदीका सासणे – कोल्हापूर यांच्यात दुसरी सेमी फायनल या दोघीत जिंकणाऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे.

आज प्रथम सेमी फायनल

Tags: अपेक्षा पाटीलकुस्ती स्पर्धामहिला कुस्ती महाराष्ट्रमहिला महाराष्ट्र केसरीवेदिका ससाणेसृष्टी भोसलेसोलापूर स्पोर्ट्स
ShareTweetSend
Next Post
IPL 2026: गुजरात 162/6; पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य

IPL 2026: गुजरात 162/6; पंजाबसमोर 163 धावांचे लक्ष्य

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.