इंडियन प्रीमियर लीग २०२६ हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आज (31 मार्च) रंगलेली लढत रोमांचक ठरत आहे.
न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 162/6 धावा केल्या.
गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात दिली, मात्र मधल्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत डाव आवरला. मधल्या षटकांत पंजाबचा गोलंदाजीवर ताबा विशेषत विजयकुमार विशाक याने प्रभावी गोलंदाजी करत महत्त्वाची विकेट्स घेतल्या.
दरम्यान, युझवेंद्र चहल यानेही निर्णायक क्षणी गिलसह महत्त्वाचे फलंदाज बाद करत सामना पंजाबकडे झुकवला.हा सामना IPL 2026 मधील सुरुवातीच्या महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानला जात असून दोन्ही संघ मजबूत असल्याने चुरस वाढली आहे. आता पंजाबसमोर 163 धावांचे हा लक्ष्याचा पाठलाग कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





