• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पदाधिकारी, पंच जाहीर

प्रा. दिनेश गुंड यांची स्पर्धा प्रमुख म्हणून नियुक्ती

by pravin
March 28, 2026
in कुस्ती, महिला महाराष्ट्र केसरी
Reading Time: 1 min read
महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पदाधिकारी, पंच जाहीर
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

सोलापूर: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित वरिष्ठ गट महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व ‘महिला महाराष्ट्र केसरी’ किताब लढतीसाठी पंच, पदाधिकारी व स्पर्धा निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धा सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे २८ ते २९ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार आहेत.

या स्पर्धेसाठी पदाधिकारी व निरीक्षक म्हणून बापूसाहेब लोंढे (सातारा), अस्लम काझी (सोलापूर), सईद चाऊस (बीड), बाळासाहेब पडघन (धाराशिव), अमर दुधाळ (सोलापूर) आणि शरद कचरे (छ. संभाजीनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच तांत्रिक अधिकारी (पंच) म्हणून माऊली सातव, संभाजी निकाळजे, नितीश काबलिये, रोहिदास आमले, विक्रम पवळे, निलेश मारणे, पप्पू कालेकर, विवेक नायकल, हेमलता घोडके, भाग्यश्री भोईर, शैला धुमाळ, उज्ज्वला साळुंखे, श्रद्धा कचरे, अश्विनी बो-हाडे, कौशल्या वाघ, धारणी येळणे, साईनाथ भोंडवे, बाबा शिरगावकर, भैरवनाथ आरकिले, प्रशांत बाबर, मेघराज सरसंबे, चंद्रकांत मोहोळ, वैभव तेली आणि अमित म्हस्के यांचा समावेश आहे.

स्पर्धा प्रमुख म्हणून प्रा. दिनेश गुंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व पंचांनी २८ मार्च रोजी सकाळी स्पर्धा स्थळी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे संघाने स्पष्ट केले आहे. या स्पर्धेमुळे महिला कुस्तीला नवे व्यासपीठ मिळणार असून, राज्यातील मल्लांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार आहे.

या भव्य स्पर्धेचे सह प्रायोजक हरितऊर्जा निर्मिती मधील अग्रेसर कंपनी *सेरेंटिका रिन्यूएबल्स *असून ह्याचे आयोजन निरझरा केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळ्रळीमोरे साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: Indian Women WrestlingKushti Spardha SolapurMaharashtra Sports NewsMaharashtra Wrestling FederationMahila KushtiMahila Maharashtra Kesari 2026Solapur Sports UpdateSolapur Wrestling Competitionsports news marathiWomen Wrestling IndiaWrestling Championship 2026Wrestling Referees Listमहिला कुस्ती स्पर्धामहिला महाराष्ट्र केसरी 2026
ShareTweetSend
Next Post
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी!

महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांची विजयी सलामी!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.