• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी

सायकलिंगमध्ये कोल्हापूरमधील पैलवानांच्या कन्येचे यश

by pravin
January 30, 2025
in नॅशनल गेम्स, सायकलिंग
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

रुद्रपूर (प्रतिनिधी): उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे. आजही तिने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत वेळ व वेग या दृष्टीने योग्य नियोजन केले होते त्यामुळेच तिला येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळाला. पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला असून ही कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी ऊर्जा देणारी असल्याचे पूजाने पदकवितरणानंतर सांगितले.

पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत. मात्र तिला फारशी कुस्तीची आवड नव्हती सुरुवातीला तिने ट्रायथलॉन मध्ये करिअर करण्याचे ठरविले होते मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर आणि सहकार्याने तिने सायकलिंग मध्ये करिअर सुरू केले. 2016 मध्ये तिने ज्येष्ठ प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचा प्राथमिक ज्ञान आत्मसात केले त्यानंतर तिने मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश पाहून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात तिची निवड झाली. तिला तेथे अनिल कुमार यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. ती इचलकरंजी येथील न्यू इंग्लिश स्कूल खंजिरे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला आहे.
उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी ट्रायथलॉनमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली होती. 3 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र मणिपूर, हरियाणा पाठोपाठ तिसर्‍या स्थानावर आहे.

Tags: 38th National Games cycling News38th National Games NewsKolhapur's Pooja Danole won the gold medalLatest sports newsMarathi sports newsSPORTS NEWS latest
ShareTweetSend
Next Post
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.