• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य

संकेत,दीपाली,सारिका, मुकुंदला रौप्य तर आकाश, शुभमला कांस्य

by pravin
January 31, 2025
in नॅशनल गेम्स, वेटलिफ्टिंग
Reading Time: 1 min read
वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचा पदकांचा षटकार, 4 रौप्य, 2 कांस्य
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

डेहराडून (प्रतिनिधी): उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामिण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी 6 पदकांची लयलुट केली. सांगलीचा राष्ट्रकुल पदक विजेता संकेत सरगर,सांगलीची दिपाली गुरसाळे, पुण्याच्या सारिका शिनगारे व नाशिकच्या मुकुंद आहेरने रूपेरी यशाचे वजन पेलले. लातूरच्या आकाश गौड व पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली.
पंधरा दिवसांपूर्वी गुडघ्याला व स्नायूला मोठ्या प्रमाणात दुखापती होऊनही सांगली जिल्ह्याची खेळाडू दिपाली गुरसाळे हिने या दुखापतीवर मानसिक तंदुरुस्ती भक्कम ठेवीत मात करीत वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक पटकाविले. दीपाली हिने 45 किलो गटातील स्नॅचमध्ये 69 किलो तर क्लीन व जर्क मध्ये 82 किलो असे एकूण 151 किलो वचन उचलले. केरळच्या सुफना जस्मिन हिने अनुक्रमे 72 व 87 असे एकूण 159 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.

पुरुषांच्या 61 किलो गटात महाराष्ट्राच्या सांगलीचा राष्टकुल पदक विजेता संकेत सरगर याने स्नॅच मध्ये 117 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 142 किलो असे एकूण 259 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले. त्याचाच सहकारी पुण्याचा शुभम तोडकर याने कांस्यपदक पटकाविले. त्याने स्नॅच मध्ये 114 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 140 किलो असे एकूण 254 किलो वजन उचलले. राष्टकुल स्पर्र्धेत हुकलेले सुवर्णपदक आता जिंकयचे असल्याचे संकेत सरगर यांनी सांगितले.

पुरुष गटातील 55 किलो गटात महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर व आकाश गौड यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये 112 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 135 असे एकूण 247 किलो वजन उचलले. आकाश गौड याने मध्ये 107 किलो वजन तर क्लीन व जर्कमध्ये 137 असे एकूण 244 किलो वजन उचलले.

पुण्याजवळील राजगुरूनगरमधील सारिका शिनगारे हिने महिलांच्या 49 किलो गटात रुपेरी यश संपादन केले तिने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 100 असे एकूण 179 किलो वजन उचलले. छत्तीसगडच्या ज्ञानेश्वरी यादव हिने अनुक्रमे 85 व 106 असे एकूण 191 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 26 वर्षीय सारिका रेल्वेची खेळाडू असून पुण्यातील वडगाव मावळ येथे अनिकेत निवघणे यांच्याकडून प्रशिक्षण घेते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिचे हे पहिलेच पदक आहे.

महिलांच्या 45 किलो गटातील दीपाली हिने गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्नॅचमध्ये 75 किलो व एकूणाचा 164 किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता यंदाही तिला राष्ट्रीय विक्रमाची अपेक्षा होती मात्र पंधरा दिवसांपूर्वी सराव करताना तिच्या गुडघ्यावर आणि स्नायूंची मोठी दुखापत झाली. त्यामुळे आपली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची संधी मुकणार की काय अशी शंका तिला निर्माण झाली मात्र तिचे प्रशिक्षक संतोष सिंहासने यांनी तिला मानसिक आधार दिला त्यामुळे तिने पंधरा दिवस जमेल तसा सराव करीत येथील स्पर्धेत भाग घेतला आणि महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदकाची कमाई करून दिली.

मुकुंद हा 21 वर्षीय खेळाडू रेल्वेमध्ये नोकरी करीत असून गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते. तो मनमाड येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याच्या मेघा व वीणाताई या दोन बहिणींही राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडू आहेत. मुकुंदचे यश पहाण्यासाठी त्याचे आजोबा एकनाथ , आजी गंगुबाई, आई इंदुबाई व वडिल संतोष आहेर डेहराडून आले होतेे. लाडक्या लेकाचे पदक पाहून सार्‍याचे कुटुंबियाचे डोळे आनंदाने पाणावले होते. आता मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे असल्याने मुकुंद यांने सांगितले.

Tags: 2 bronze38th National Games News38th National Games weightlifters News4 silverAkash Goud of LaturDeepaliDipali Gursale of SangliMaharashtra won six medals in weightliftingMukund got silver and AkashSanketSanket SargarSarikaSarika Shingare of Pune and Mukund Aherne of Nashik.Shubham got bronzeShubham Todkar of Pune won bronze
ShareTweetSend
Next Post
सान्वी देशवालचे सोनेरी यश

जलतरणामध्ये महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, सान्वी देशवालचे सोनेरी यश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.