• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

नॅशनल गेम्स २०२२: महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका

by pravin
September 27, 2022
in कबड्डी, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२: महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अहमदाबाद-  सुपरस्टार रेडर पूजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात यजमान गुजरातला धूळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ४६-२२ ने दणदणीत सामना जिंकला. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात आपले वर्चस्व राखून ठेवले.

यासह महाराष्ट्र संघाला सलग दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद करता आली. महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला विजय साजरा केला. प्रशिक्षक संजय माेकळ यांच्या अचूक डावपेचातून महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. आता महाराष्ट्र संघाला आज बुधवारी विजयी हॅटट्रिकची संधी आहे. महाराष्ट्राचा गटातील तिसरा सामना बिहारशी हाेणार आहे.

पूजा, मेघाची सर्वाेत्तम खेळी:

महाराष्ट्र संघाने मंगळवारी गटातील दुसऱ्या सामन्यासाठी संघात एक बदल केला. बाेनसची स्टार साेनाली शिंगटेला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी पूजा यादवला संधी देण्यात आली. या विश्वासाला सार्थकी लावताना पूजा यादवने सुरेख चढाई करून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. आपल्या शैलीदार चढाईतून तिने यजमान गुजरातविरुद्ध सर्वाधिक गुणांची कमाई केली. त्याचबराेबर अशाच प्रकारची ताेडीसताेड खेळी मेघा कदमने केली. त्यामुळे संघाच्या माेठ्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला.
अंकिता,सायलीची अचुक पकड

नॅशनल गेम्स २०२२: महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका

महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू अंकिता जगताप आणि सायली जाधवची खेळी लक्षवेधक ठरली. त्यांनी आपल्या अचूक पकडीतून गुजरात टीमच्या रेडरचा गडी मारण्याचा प्रयत्न वेळाेवेळी हाणुन पाडला. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पकडीतून अंकिता आणि सायलीने सामना गाजवला.

नॅशनल गेम्स २०२२: महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका

बिहारविरुद्ध विजयाची संधी :
महाराष्ट्र महिला संघाला आता गटात विजयी हॅटट्रिकची संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघ बुधवारी गटातील तिसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे. महाराष्ट्र आणि बिहार यांच्यात सामना रंगणार आहे. यजमान गुजरातला पराभूत करून बिहारने सलामी दिली हाेती.

Tags: 36th National Games36th National Sports Tournament NewskabaddiMaharashtra women's kabaddi team's winning double bangNational Games 2022 Latest News
ShareTweetSend
Next Post
नॅशनल गेम्स २०२२: सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

नॅशनल गेम्स २०२२: सलग दुसऱ्या विजयासह महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.