• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महाराष्ट्राने पदकांचे दीडशतक ओलांडले!

by pravin
November 2, 2023
in अन्य खेळ, तायक्वांदो, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
महाराष्ट्राने पदकांचे दीडशतक ओलांडले!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत पदकांचे दीडशतक ओलांडले आहे. जलतरण, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, कुस्तीमधील पदकांच्या बळावर महाराष्ट्राने आतापर्यंत ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्यपदकांसह एकूण १६१ पदके जिंकत पदकतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे. सेनादल (३७ सुवर्ण, १३ रौप्य, १३ कांस्य) दुसऱ्या आणि हरयाणा (३१ सुवर्ण, २१ रौप्य, ३३ कांस्य) तिसऱ्या स्थानावर आहेत.

जलतरणात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकले. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य व एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले.

महाराष्ट्राने टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली. रोल बॉलमध्ये महाराष्ट्र महिला संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला, तर पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले.

add

याचप्रमाणे महाराष्ट्राच्या तायक्वांदोपटूंनी तीन कांस्य तर नंदिनी साळोखेने कुस्तीमधील ५० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.

तायक्वांदो महाराष्ट्राला तीन कांस्य पदके

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने गुरुवारी तीन कांस्य पदके पटकावली. महाराष्ट्राकडून प्रसाद पाटील, भारती मोरे आणि मृणाल वैद्य यांनी कांस्य पदके मिळवली.

Tags: 37th National Games Taekwondo Maharashtra37th National Games Taekwondo Maharashtra news37th National Games Taekwondo Maharashtra three bronze medals
ShareTweetSend
Next Post
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.