• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत

by pravin
November 3, 2023
in अन्य खेळ, जलतरण, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघ २६ वर्षांनी अंतिम फेरीत
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगाल संघावर १६-४ असा दणदणीत विजय नोंदवला आणि वॉटरपोलोमधील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तब्बल २६ वर्षांनी महाराष्ट्र संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना आता कांस्यपदकासाठी खेळावे लागणार आहे.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत अरुण मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच पश्चिम बंगाल विरुद्ध वर्चस्व गाजवले. महाराष्ट्रकडून सारंग वैद्य व उदय उत्तेकर यांनी प्रत्येकी चार गोल केले तर गौरव महाजनी व पियुष सूर्यवंशी यांनी प्रत्येकी दोन गोलांची नोंद केली. अंतिम फेरीत महाराष्ट्रास सेनादल संघाबरोबर खेळावे लागणार आहे. महिलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राला केरळ संघाने १६-७ असे सहज पराभूत केले. शनिवारी सकाळी होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्राची कर्नाटक संघाची गाठ पडणार आहे. त्यानंतर पुरुष गटाचा अंतिम सामना होणार आहे.

डायव्हिंगमध्ये ऋतिका श्रीरामची पदकांची हॅट्ट्रिक
महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंगमध्ये एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक जिंकताना पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिने १५१ गुण नोंदवले. या स्पर्धेमध्ये तिने या अगोदर एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले होते.

ऋतिका ही सोलापूरची खेळाडू असून तिचे पती हरिप्रसाद हेदेखील आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटू आहेत. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या ऋतिकाला तीन वर्षांचा मुलगा असूनही ती नियमितपणे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. दोन वर्षांपूर्वी तिला राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळाली होती तर गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील दोन सुवर्ण व एका कांस्यपदकाची कमाई केली होती.

जलतरणात ऋषभ दासची रूपेरी हॅट्ट्रिक

महाराष्ट्राच्या ऋषभ दासने पुरुषांच्या ५० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वतःची रूपेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली. याचप्रमाणे मिश्र रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळाले. जलतरणात महाराष्ट्राने शुक्रवारी तीन रौप्यपदके कमावली.

ऋषभने ही शर्यत २६.६६ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाचा श्रीहरी नटराजने (२५.७७ सेकंद) सुवर्णपदक जिंकले.

ऋषभने याआधी या स्पर्धेत १०० मीटर्स बॅकस्ट्रोक व २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ऋषभ हा ठाणे येथे ज्येष्ठ प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ऋषभने आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत.

महाराष्ट्र संघाने चार बाय १०० मीटर्स मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मित मखिजा, अवंतिका चव्हाण, ऋजुता खाडे व वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने ही शर्यत ३ मिनिटे, ४२.६१ सेकंदांत पार केली. कर्नाटक संघाने हेच अंतर ३ मिनिटे, ३८.२४ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa newsIn water poloMaharashtra men's team in the final after 26 years
ShareTweetSend
Next Post
सायकलिंग वैयक्तिक सुवर्णपदकासह मयुरी लुटेची हॅट्ट्रिक

सायकलिंग वैयक्तिक सुवर्णपदकासह मयुरी लुटेची हॅट्ट्रिक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.