• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

पदकाचा डबल धमाका, मुलांना सुवर्ण, मुलींना रौप्‍य

by pravin
May 9, 2025
in खेलो इंडिया यूथ गेम्स, खो-खो
Reading Time: 1 min read
खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

गया – बिहार (प्रतिनिधी) : महाराष्ट्राने आपली हुकूमत गाजवित ७ व्‍या खेलो इंडिया युवा स्‍पर्धेत सलग सातव्‍यांदा पदकाला गवसणी घातली. मुलांनी सुवर्ण, तर मुलींच्‍या संघाने रूपेरी यश संपादन केले. जलतरणात पदकाचा धडका कायम ठेवत रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णासह १ रौप्‍य व १ कांस्य पदकाची कमाई केली.
बिपार्ड मैदानावर संपलेल्‍या खो खो स्‍पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. मुलांच्‍या गटात महाराष्ट्राने ओरीसावर ३४-२५ गुणांनी मात करून सलग सातव्‍यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला.

मुलींच्‍या गटात ओरीसाकडून महाराष्ट्र ३१-३४ गुणांनी पराभूत झाला, केवळ ३ गुणांनी महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले. या संघातील विश्वविजेत्‍या अश्विनी शिंदे हीने सलग चौथ्यांदा पदक जिंकण्याचा विक्रमही नोदंविला.

मुलांच्‍या गटात सुरूवातीपासून ओरीसा विरूध्द महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. अचूक गडी टिपून संरक्षणातही महाराष्ट्र आघाडीवर राहिला. जितेंद्र वासवे याने तब्बल २ मिनिटाची ड्रीम रन करीत ओरीसाला झुंजवलेपूर्वार्धात १६-१० गुणांनी आघाडी घेतल्‍यानंतर आशिष गौतम, राज जाधव व शरद घाडगे यांनी अष्टपैलू खेळ करीत पहिल्‍याच फेरीपासून विजयी वाटचाल सुरू केली होती. ९ गुणांनी विजय संपादून महाराष्ट्राने खेलो इंडियातील आपली सुवर्ण परंपरा कायम राखली. पदकवितरण समारंभानंतर गणपती बाप्‍पा मोरया, जय भवानी-जय शिवाजी जसघोष करण्यात आला.

मुलींच्‍या गटात महाराष्ट्राची आक्रमणात पिछेहाट झाल्‍याने ओरिसाने बाजी मारली. अटीतटीच्‍या लढतीत पहिल्‍या मिनिटापासून महाराष्ट्राने चपळ दर्शवली. अमृता पाटील, सुहानी धोत्रे व प्रतिक्षा बिराजदार यांचा अष्ट्रपैलू खेळ सामना जिंकण्यासाठी अपुरा ठरला. गडी बाद करण्यात अपयश आल्‍याने ओरीसाने ३ गुणांनी विजेतेपद पटकावले. खेलो इंडिया स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या मुलीचे हे सातवे पदक आहे. गत तामिळनाडू स्‍पर्धेत महाराष्ट्र चॅम्‍पीयन ठरला होता.

बिपार्ड जलतरण तलावावर सुरू असलेल्‍या जलतरणात मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदकाचा सूर मारला. निशी रुहील, समाईरा मल्‍होत्रा, आदिती हेगडे, अल्फेया धनसुरा या संघाने ४ मिनिटे ३१.०९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण कामगिरी केली. कर्नाटकला रौप्य तर तमिळनाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदिती हेगडेने स्‍पर्धेत पदक जिंकण्याचा षटकार झळकविला आहे. ४ सुवर्ण २ रौप्‍य पदकाची सर्वाधिक पदकाची करिश्मा घडविला आहे.

१८ वर्षांखालील मुलींच्या २०० मीटर मिडले प्रकारात निशी रुहील (२:२९.६२ सेकंद) हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकच्या मानवी वर्माने (२:२८.०३ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या ८०० मीटर फ्रीस्‍टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटील (८.४२.१५ सेकंद) याला कांस्यपदाकवर समाधान मानावे लागले. निशी व अथर्वराजचे हे स्‍पर्धेतील दुसरे पदक आहे.

आपल्‍या पाल्‍याचे यश पहाण्यासाठी अनेक खेळाडूंचे आई-वडिल स्‍टेडियममध्ये हजर होती. महाराष्ट्रातील खेळाडूंचे पोस्‍टर प्रर्दशित करीत त्‍यांच्‍या पालकांनी त्‍यांनी प्रोत्‍साहित केले.

Tags: 7th Khelo India Youth Competition Bihar 2025 newsDouble explosion of medals newsKhokho Maharashtra girls win silverKhokho Maharashtra wins gold New
ShareTweetSend
Next Post
७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.