• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

by pravin
May 10, 2025
in खेलो इंडिया यूथ गेम्स, नेमबाजी
Reading Time: 1 min read
७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या पार्थ माने व शांभवी क्षीरसागर या जोडीने पात्रता फेरीपासून वर्चस्व गाजवित ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर शुक्रवारीही महाराष्ट्राचा सुवर्ण धमाका कायम राहिला. वैयक्‍तिक प्रकारात सोनेरी यश मिळविलेल्या शांभवी क्षीरसागर हिने पार्थ मानेच्या साथीत १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवित ६३४.९ गुणांसह अव्वल स्थानासह अंतिम फेरीत धडक दिली. मानांकनात कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहार या संघांना मागे टाकत महाराष्ट्र अव्‍वल स्‍थानावर राहिला.

सुवर्णपदकासाठी महाराष्ट्र व कर्नाटक लढत रंगली. पहिल्‍या फेरीपासूप अनुभवी पार्थच्‍या साथीने शांभवीने संयमी खेळी करीत अव्‍वल स्‍थान कायम राखले. शांभवी – पार्थ या महाराष्ट्रीय जोडीने १६ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा वेध घेतला. कर्नाटकच्या प्रणव नरेन-हद्या कांदुर जोडीला १२ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बिहारच्या रूद्र प्रताप सिंह व दिव्‍या भह जोडीने उत्तर प्रदेशला १६-१४ गुणांनी पराभूत करीत कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारली.

रायगडच्‍या पार्थ माने हे खेलो इंडिया स्‍पर्धेतील सलग दुसरे सवुर्णपदक आहे. उत्तराखंडातील राष्ट्रीय स्‍पर्धेतही सुवर्णपदक जिंकणारा पार्थ शनिवारी वैयक्‍तिक प्रकरातही पदकासाठी सज्‍ज झाला आहे. नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला पार्थ युवा व वरिष्ठ गटात सुवर्णपदक. जिंकणारा एकमेव राष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. पनवेलमध्ये सुमा शिरूर यांच्‍या लक्ष्य ॲकॅडमीत तर कसून सराव करीत असतो.

Tags: 7th Khelo India Youth Games newsParth - Shambhavi pair hit the target accurately in shooting NewsShooting 10m Air Rifle Mixed Team Group at the 7th Khelo India Youth Games
ShareTweetSend
Next Post
खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत 30 खेळाडूंचा सत्कार

खेलो इंडिया पदक प्राप्त दहावी व बारावी गुणवंत 30 खेळाडूंचा सत्कार

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.