• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया पॅरा गेम्स; ॲथलेटिक्समध्ये सचिन, तर नेमबाजीत स्वरूपला सुवर्ण

by pravin
December 14, 2023
in ॲथलेटिक्स, खेलो इंडिया, नेमबाजी
Reading Time: 1 min read
खेलो इंडिया पॅरा गेम्स; ॲथलेटिक्समध्ये सचिन, तर नेमबाजीत स्वरूपला सुवर्ण
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी): पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला नेमबाज स्वरुप उन्हाळकर आणि धावपटू सचिन खिल्लारी यांनी खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. पहिले तीन दिवस पदकांचा सपाटा लावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना आज मर्यादित यशावर समाधान मानावे लागले.

ॲथलेटिक्समध्ये एफ ४६ प्रकारात मुंबईच्या सचिन खिल्लारीने १५.६३ मीटर गोळा फेक करताना सुवर्ण कामगिरी केली. गीता चव्हाण, दिलीप गावित, भाग्यश्री जाधव यांच्याप्रमाणेच सचिनने यश मिळवताना महाराष्ट्राचा ॲथलेटिक्समध्ये दबदबा राखला. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राला सहा सुवर्ण आणि सहा ब्राँझपदकेही मिळाली आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कमालीच्या जिद्दीने खेळ करताना आपले कौशल्य पणाला लावले. त्यांच्या प्रयत्नांना पदकाची पावती मिळाली. या खेळाडूंमुळे महाराष्ट्राला वर्चस्व राखता आले अशा शब्दात प्रशिक्षक सुरेख काकड यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेल्या स्वरुप उन्हाळकरने आपला लौकिक कायम राखला. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅंडिंग एसएच १ प्रकारात २४३.५ गुणांची कमाई करत सुवर्ण वेध साधला. या स्पर्धा प्रकारात किरण केंगलकर पाचव्या स्थानावर राहिला. स्वरुप ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत असून, अलिकडेच त्याची गुणवत्ता बघून रायफल उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या वॉल्थर कंपनीने त्याला अधुनिक बनावटीची नवी रायफल भेट म्हणून दिली होती. या रायफलशी जुळवून घेण्यास वेळ लागेल. पण, ही भेट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी कौशल्य पणाला लावेन, असा विश्वास स्वरुपने व्यक्त केला.

महाराष्ट्राला आता शुक्रवारी सुरु होणाऱ्या तिरंदाजी स्पर्धा प्रकारातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत महाराष्ट्र ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ११ ब्राँझ असा २४ पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. हरियाना (२५, ३१, १३) ६९ पदकांसह अव्वल स्थानावर असून, उत्तर प्रदेश (२०, १६, ८) ४४, तमिळनाडू (१४, ४, १०) २८ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Tags: Goldkhelo india para games 2023khelo india para games 2023 maharashtra newsPara AthleticsPara ShootingPERFORMANCE 15.63MSachin Khillari SHOT PUT F46 GOLDSwaroop Unhalkar
ShareTweetSend
Next Post
पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक

पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.