• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक

by pravin
December 16, 2023
in अन्य खेळ, खेलो इंडिया, बातम्या
Reading Time: 1 min read
पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि साई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरु असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची स्पर्धेत आता ९ सुवर्ण, ६ रौप्य, १२ ब्रॉंझ अशी २७ पदके झाली असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. हरियाना ३५ सुवर्ण, ३७ रौप्य, १९ ब्रॉंझपदकांसह ९१ पदके मिळवून अग्रस्थान टिकवून आहे. उत्तर प्रदेश (२४, १८, ९) ५१, तमिळनाडू (१७, ६, १३)३६, गुजरात (११, १६, ११) ३८ आणि राजस्थान (९, १९, ११) ३९ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थनावर आहेत.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या एलिट १०७ किलो वजन गटात १४८ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. त्याचे रौप्यपदक केवळ दोन किलोंनी हुकले. राजस्थानच्या मिलन कुमारने १५० किलो वजन उचलताना रौप्यपदकाचा मान मिळविले. महाराष्ट्राचे हे या क्रीडा प्रकारातील चौथे पदक ठरले.

कामगिरी समाधानकारक – सारिका सरनाईक
पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राने चार पदके मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. खेळाडूंच्या कठोर मेहनतीमुळेच हे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात अनेक युवकांना या कामगिरीने प्रेरणा मिळेल, अशा शब्दात प्रशिक्षक सारिका सरनाईक यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.

टेबल टेनिसमध्ये आगेकूच
महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना आपली आगेकूच कायम राखली. पुरुष गटात दत्तप्रसाद चौगुले, विश्व तांबे यांनी विजय मिळविले. महिला गटात क्लास ६ प्रकारातून वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. या कामगिरीने महाराष्ट्राची या खेळातील पदकाची खात्री निर्माण झाली आहे.

टेबल टेनिस निकाल –

क्लास ९ – दत्तप्रसाद चौगुले वि. वि,. ब्रिजेंद्र सिंग ११-३, ११-९, ११-२
क्लास १० – विश्व तांबे वि.वि. जगन्नाथ मुखर्जी ११-५, १६-१४, ८-११, ११-५, ओम लोटलीकर पराभूत वि. हितेश दलवानी ७-११, ८-११, ७-११
क्लास ८ – स्वप्नील शेळके पराभूत तुषार नागर ९-११, ७-११, ११-९, ८-११
क्लास ५ – विवेक मोरे पराभूत वि. आर. अलागर ४-११, ५-११, ४-११, रिषीत नथवानी वि.वि. अभिषेककुार सिंग ११-५, ११-४, ११-७

महिला –
क्लास ६ – वैष्णवी सुतार पराभूत वि. भाविका कुकाडिया ७-११, ९-११, ६-११, वैष्णवी सुतार वि.वि. नयना कांबळे ११-१, ११-१, ११-१,
क्लास ९,१० – पृथ्वी बारे वि.वि. मेहक कासार ९-११, १७-१५६, ८-११, ११-५, ११-९,
क्लास ६ – उज्वला चव्हाण पराभूत वि. पूनम ३-११, ४-११, ७-११, उज्वला चव्हाण वि.वि. उर्मिला पाल ११-७ ११-८, ४-११, १४-१२

Tags: Bronze Medal to Dinesh Bagde in Powerliftingkhelo india para games 2023
ShareTweetSend
Next Post
पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.