• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ऐतिहासिक निर्णय ; शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त संघ,खेळाडू यांना पदके व चषक मिळणार

जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन

by pravin
July 28, 2025
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय, बातम्या
Reading Time: 1 min read
ऐतिहासिक निर्णय ; शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त संघ,खेळाडू यांना पदके व चषक मिळणार

जिल्हाधिकारी यांचे शुभहस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करतांना

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीरनगर (प्रतिंनिधि):  नुकतीच शुक्रवार रोजी जिल्हा क्रीडा परिषद,छत्रपती संभाजीरनगर यांची बैठक  दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25/07/2025 रोजी त्यांचे दालणामध्ये संपन्न झाली.   सर्व प्रथम मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. बाजीराव देसाई जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्या मागणीला यश  जिल्हास्तर स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त संघ,खेळाडू यांना पदके व चषक प्रदान करण्याकरीता बैठकीमध्ये चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. सदरील बैठकीमध्ये दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे शुभहस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 आयोजनाबाबत समितीसमोर चर्चा करण्यात आली.

बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.

ऑनलाईन प्रणालीमध्ये जिल्ह्याच्या क्रीडा विकासाबाबत प्रत्येक शाळेतील क्रीडा विषयक सोई सुविधांचे करण्यास समितीची मान्यता मिळाली. तालुका,जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तर स्पर्धांचे आयोजन नियोजन करण्यासाठी पंच म्हणून नियुक्ती पत्र दिल्यानंतर शाळेतून कार्यमुक्त करण्यासाठी  शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र देण्याचे आदेशीत करण्यात आले.

याप्रसंगी बैठकीकरीता जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगरचे सदस्य एस.एस. देशमुख, पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर,  श्रीमती डी.टी. शिरसाट, विस्तार अधिकारी, प्रतिनिधी शिक्षणाधिकारी माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर, डॉ.उदय डोंगरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी , गोकुळ तांदळे सचि  जिल्हा सॉफ्टबॉल संघटना,  प्रपित मोघे, बँक ऑफ महाराष्ट्र (लिड बँक), जिल्हा माहिती अधिकारी प्रतिनिधी  यशोदा ताढे,  बाजीराव देसाई,जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर,  मुकूंद वाडकर, तालुका क्रीडा अधिकारी, सोयगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे  क्रीडा अधिकारी, सुजाता गुल्हाणे,डॉ. रेखा परदेशी,  खंडू यादवराव, राम मायंदे, क्रीडा मार्गदर्शक पुनम नवगिरे,  शिल्पा मोरे, तुषार आहेर आदीची उपस्थित होते.

             अध्यक्ष जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी यांनी खंत व्यक्त केली की, मला मैदानावर खेळाडू खेळतांना दिसत नाही याचधर्तीवर  महोदय यांनी माहे ऑगस्ट 2025 मध्ये सर्व जिल्ह्यातील शाळेमध्ये खेळ व खेळाचे महत्व कसे पटवून सांगता येईल. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये एकाच दिवशी 1 तासाचे व्याख्यानचे आयोजन करण्याचे व क्रीडा खात्यामार्फत खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या क्रीडा सुविधा व योजना हे प्रत्येक खेळाडू पर्यंत कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले. 

 शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना असे आदेशीत केले की, तालुकास्तर, जिल्हा स्तर सर्व शाळांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे अनिवार्य करावे या आशयाचे पत्र सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना देण्याचे आदेशीत करण्यात आले.

Tags: Chhatrapati SambhajinagarDilip SwamyDistrict CollectorHistoric decision; Teams and players who excel in school district level sports competitions will receive medals and trophies
ShareTweetSend
Next Post
लहानग्या भगिनींचा पराक्रम ; अवघ्या चार तासांत सर केले कळसुबाई शिखर

लहानग्या भगिनींचा पराक्रम ; अवघ्या चार तासांत सर केले कळसुबाई शिखर

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.