• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

लहानग्या भगिनींचा पराक्रम ; अवघ्या चार तासांत सर केले कळसुबाई शिखर

by pravin
September 3, 2025
in अन्य खेळ
Reading Time: 1 min read
लहानग्या भगिनींचा पराक्रम ; अवघ्या चार तासांत सर केले कळसुबाई शिखर
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे १६४६ मीटर (५,४०० फूट) उंचीचे कळसुबाई शिखर अवघ्या चार तासांत सर करून छत्रपती संभाजीनगरातील दोन लहानग्या बहिणींनी उल्लेखनीय पराक्रम गाजवला आहे.

केवळ चार वर्षे आठ महिन्यांची तनिष्का नवनाथ वेताळ आणि सात वर्षे अकरा महिन्यांची तिची मोठी बहीण नित्या नवनाथ वेताळ यांनी आपल्या कुटुंबासोबत हा थरारक ट्रेक पूर्ण केला. दोघींचे शिक्षण सीएसएमसी, गारखेडा येथे सुरू असून तनिष्का ही ज्युनिअर केजीत तर नित्या तिसरीत शिकते.

आई रेणुका, वडील नवनाथ तसेच काका बाळासाहेब वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही बहिणींनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता बारी गावाच्या पायथ्यावरील हनुमान मंदिरातून ट्रेकला सुरुवात केली. अवघ्या चार तासांत म्हणजेच सकाळी अकरा वाजता त्यांनी सर्वोच्च शिखरावरील कळसुबाई मंदिर गाठले. त्यावेळी भारतीय तिरंगा फडकावत शिखराला मानवंदना देण्याचा क्षण त्यांनी अनुभवला.

या पराक्रमापूर्वी त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत मोहन उबाळे यांना माहिती दिली होती. उबाळे सरांनी या दोघींच्या धाडसाचे व चिकाटीचे मनःपूर्वक कौतुक केले.

पावसाळ्यातील कळसुबाई ट्रेक म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव मानला जातो. धुके, दऱ्या-खोऱ्या, झरे-धबधबे आणि ढगांच्या सान्निध्यात चालत जाणारा रोमांचकारी प्रवास या लहानग्यांनी अनुभवला. विशेषतः ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील स्टीलच्या शिड्या आणि लोखंडी रेलिंग पार करताना त्यांनी मृत्यूला नजर देणारा थरारही पार पाडला.

वडिलांकडून प्रेरणा घेत या दोन्ही बहिणींनी केवळ चार तासांत शिखर सर करून — वय लहान असले तरी पराक्रम मोठा असतो हे दाखवून दिले आहे.

ShareTweetSend
Next Post
“पाकिस्तानी स्पिनरला संघात घेताच वाद पेटला; सनरायझर्सचे अकाउंटही सस्पेंड?

“पाकिस्तानी स्पिनरला संघात घेताच वाद पेटला; सनरायझर्सचे अकाउंटही सस्पेंड?

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.