• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मिश्र दुहेरीत सानिलच्या साथीने सुवर्ण, तर एकेरीत रौप्यपदक

by pravin
November 2, 2023
in टेबल टेनिस, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
मिश्र दुहेरीत सानिलच्या साथीने सुवर्ण, तर एकेरीत रौप्यपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी): दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राने गुरुवारी टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली.

गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोर्टवर झालेल्या या स्पर्धेतील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या सानिल आणि दिया चितळे जोडीने पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य आणि कौशानी नाथ जोडीचे आव्हान अंतिम फेरीत ३-० (११-६, ११-४, ११-२) असे सहज मोडीत काढले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दियाने अर्चना कॉमतला कडवी झुंज दिली. परंतु दियाने १-४ (४-११, ७-११, ६-११, ११-७, १०-१२) अशी हार पत्करली. त्याआधी उपांत्य सामन्यात दियाने महाराष्ट्राच्याच स्वस्तिका घोषचा ४-० असा पराभव केला. त्यामुळे स्वस्तिकाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण आठ पदके पटकावली आहेत. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक रौप्य आणि चार कांस्य अशी पाच पदके मिळवली होती.

दिया चितळेचे दुहेरी यश

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी अपेक्षेप्रमाणे खूपच चांगली कामगिरी करताना आठ पदके मिळवली आहेत. पण तीन पदके थोडक्यात निसटल्याची खंत वाटते. अन्यथा, ही आणखी तीन पदके महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली असती, तर महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध झाले असते.
-महेंद्र चिपळूणकर, महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघाचे प्रशिक्षक

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa news37th National Games Goa Table TennisGold in Mixed Doubles with SanilSilver in Singles
ShareTweetSend
Next Post
आशियाई लॉंग टेनिस; छत्रपती संभाजीनगरची व्रंदिका राजपूत अंतिम फेरीत प्रवेश

आशियाई लॉंग टेनिस; छत्रपती संभाजीनगरची व्रंदिका राजपूत अंतिम फेरीत प्रवेश

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.