• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आशियाई लॉंग टेनिस; छत्रपती संभाजीनगरची व्रंदिका राजपूत अंतिम फेरीत प्रवेश

by pravin
November 2, 2023
in बातम्या, लॉंग टेनिस, स्पर्धा
Reading Time: 1 min read
आशियाई लॉंग टेनिस; छत्रपती संभाजीनगरची व्रंदिका राजपूत अंतिम फेरीत प्रवेश
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): ईएमएमटीसी  आयोजित आणि एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए आशियाई 16 वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात हृतिक कटकम, आयुश पुजारी यांनी, तर मुलींच्या गटात व्रंदिका राजपूत, पार्थसारथी मुंढे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एन्ड्युरंस टेनिस कॉम्प्लेक्स विभागीय क्रीडा संकुल गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित हृतिक कटकमने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत फजल अली मीरचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित आयुश पुजारी याने चौथ्या मानांकित निवेद पोनपा कोनेराचा 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित पार्थसारथी मुंढेने दिया अग्रवाचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या वृंदिका राजपूत हिने रिद्धी शिंदेचा 4-6, 6-2, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले.

दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात पार्थसारथी मुंढे व अव्यक्त रायवरपू या जोडीने अव्वल मानांकित मधुमिता रमेश व दक्षिणश्री एसआर यांचा 6-1, 6-2 असा तर, दिया अग्रवाल व व्रंदिका राजपूत यांनी त्वेशा नंदनकर व रिया गंगाम्मा पुडियोक्काडा यांचा 7-5, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

निकाल एकेरी मुले उपांत्य फेरी: 
हृतिक कटकम(भारत)[1]वि.वि.फजल अली मीर (भारत) 6-3, 6-3;
आयुश पुजारी(भारत)[2]वि.वि.निवेद पोनपा कोनेरा (भारत) [4] 6-3, 6-3;

मुली:
पार्थसारथी मुंढे (भारत)[1]वि.वि.दिया अग्रवाल (भारत) 6-2, 6-1;
व्रंदिका राजपूत(भारत)[2]वि.वि.रिद्धी शिंदे (भारत) 4-6, 6-2, 6-1.

दुहेरी उपांत्यपूर्व फेरी मुले:
वरद पोळ (भारत)/आयुश पुजारी(भारत)[1]वि.वि.इशान खडीर (भारत)/देवेंद्र कुलकर्णी (भारत) 6-1, 6-1;
आदित्य आचार्य(भारत)/ क्रिशांक जोशी(भारत)वि.वि.सिद्धेश खाडे(भारत)/ कृष्णा राणी(भारत)6-2,6-0;
फजल अली मीर (भारत)/ प्रकाश सरन(भारत)वि.वि.यशराज जरवाल(भारत)/ मलय केयूरभाई मिंजरोला (भारत) 6-1, 6-2;

मुली:
पार्थसारथी मुंढे(भारत) / अव्यक्त रायवरपू (अमेरिका)वि.वि.मधुमिता रमेश (भारत) / दक्षिणश्री एसआर(भारत)[1] 6-1, 6-2;
मेहा पाटील (भारत)/ रिद्धी शिंदे(भारत)वि.वि.काव्या देशमुख (भारत) / आर्या शिंदे (भारत) 6-1, 6-7(1), 10-8
ईश्वरी मार्कंडे (भारत)/संयुक्ता पगारे (भारत)वि.वि.पृथा राव (भारत) कृतिका रेड्डी वंगाला (भारत)6-1, 4-6, 10-2;
दिया अग्रवाल (भारत) / व्रंदिका राजपूत (भारत)वि.वि. त्वेशा नंदनकर (भारत)/रिया गंगाम्मा पुडियोक्काडा (भारत)7-5, 7-5.

Tags: Asian Long TennisChhatrapati SambhajinagarChhatrapati Sambhajinagar's Vrandika Rajput enters the final roundLong Tennis news
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्राने पदकांचे दीडशतक ओलांडले!

महाराष्ट्राने पदकांचे दीडशतक ओलांडले!

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.