• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शेतकऱ्याची गोफण वर्ल्ड कपचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज

by pravin
September 5, 2021
in बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद-गोफण (स्लिंग) प्राचीन काळापासून एक सुरक्षेचे साधन म्हणून वापरले जाणारे पण दुर्लक्षित असे साधन. परंतु, २१ व्या शतकात हीच कला खेळ म्हणून उदयास आली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा वेगाने प्रसार होत आहे. या गोफणमुळे शेतकरी व त्यांच्या पुत्रांसह इतरांना क्रीडा क्षेत्रात नवे व्यासपीठ निर्माण झाले झाले. स्पेनसह हा खेळ आता  छातीस देशांमध्ये पोहोचला आहे.अश्मयुगापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे सैन्यही युद्धात गोफणीचा हत्यार म्हणून उपयोग करत. उमाजी नाईक यांनी गोफणीच्या जोरावर इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. ग्रामीण भागातील शेतकरी पिकांचे जंगली प्राण्यांपासून व पक्ष्यापासून रक्षण करण्यासाठी आजही गोफणीचा वापर करतात. आता भारतात अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशनच्या माध्यमातून गोफण खेळण्याची संधी मिळाली आहे.

सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा प्रकार
स्पर्धा वैयक्तिक व सांघिक (५ खेळाडू) प्रकारात खेळली जाते. यात सोळा वर्षाखालील आणि सोळा वर्षावरील दोन गट असतात. जेष्ठ शेतकरी देखील यात खेळू शकतात. १६ वर्षाआतील गटात शॉर्टमध्ये दहा मीटर व लाँन्गमध्ये वीस मीटर प्रकार आहेत. सोळा वर्षाआतील गटात तीस मीटर प्रकार असतो. प्रत्येक खेळाडूला टार्गेटवर ५ हिट करावे लागतात. टार्गेट बॉक्स १.२० चौरस मीटरचा आणि आतील वर्तुळ ५० स्कोटर मीटरचे असते. जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावले जाते. वर्तुळात दगड-चेंडू लागल्यास २ गुण व बोर्डला लागल्यास १ गुण मिळतो. सर्वाधिक गुण मिळवणारा विजयी बनतो.

बारा राज्यांत खेळला जातो हा खेळ, महाराष्ट्रातील तीस जिल्हे प्रसिद्ध

भारतात या खेळाचे पुणे मुख्यालय असून येथील भागवत क्रीडा संकुलात खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. शिबिरे व ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केल्या जातात.या खेळाच्या आतापर्यत ७ आंतरराष्ट्रीय स्पर्धा व एक विश्व कप स्पर्धा झाली आहे. स्पेनमध्ये १४ ते १७ ऑक्टोबर२०२१  मध्ये दुसरी विश्व कप स्पर्धा होणार असून स्पर्धेत ३४ देशांचे संघ सहभागी हाेणार आहेत.

असे आहे खेळाचे साहित्य

गोफण हे ग्रामीण भागात सर्वत्र सहज उपलब्ध होते. सुताच्या दोरीपासून तयार केलेली असते. तिची लांबी १.५ ते २ मीटर असते. खेळाचे चेंडू व दुसरा दगड असे दोन प्रकार आहेत. टेनिस बॉलचे वजन ५६-५८ ग्रॅम आणि नदीतील गोट्याचे वजन १२८-१३० ग्रॅम असते. साहित्याचा खर्च अवघे ३०० रुपये येतो.कुंडलिक कचाले, कार्यकारी संचालक, अमॅच्युअर स्लिगिंग इंडिया फेडरेशन म्हणाले,आम्ही शिवकालीन युद्धकला जपतो. गोफणदेखील एक पारंपरिक वारसा आहे. ताे आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. त्याला खेळाचे स्वरूप आल्याने आणखी प्रसिद्ध होईल. या खेळाचा ज्येष्ठ शेतकरी व त्यांच्या मुलांना अधिक फायदा होईल. कारण, या खेळाला १ हजार रुपयेदेखील खर्च येत नाही. -.

ShareTweetSend
Next Post

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड चाचणी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.