• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

टेनिस दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके पुरुष दुहेरीत अर्जुन-पूरव, तर महिला दुहेरीत ऋतुजा-प्रार्थना अजिंक्य

by pravin
November 4, 2023
in टेबल टेनिस, नॅशनल गेम्स, बातम्या
Reading Time: 1 min read
टेनिस दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके पुरुष दुहेरीत अर्जुन-पूरव, तर महिला दुहेरीत ऋतुजा-प्रार्थना अजिंक्य
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मडगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंनी शनिवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुहेरीतील दुहेरी सुवर्णपदके जिंकून मने जिंकली. महिला दुहेरीत ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे जोडीने आणि पुरुष दुहेरीत अर्जुन कढे आणि पूरव राजा जोडीने जेतेपद पटकावले. याशिवाय वैष्णवी अडकरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात ऋतुजा आणि प्रार्थना जोडीने तेलंगणाच्या रश्मिका भमिडीपती आणि श्राव्या शिवानी जोडीवर ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्जुन-पूरव जोडीला कर्नाटकच्या आदिल कल्याणपूर आणि प्रज्ज्वल देव यांनी झुंजवले. पण तरीही अर्जुन-पूरव जोडीने ७-६, ६-३ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात वैष्णवीने गुजरातच्या वैदेही चौधरीकडून ०-६, २-६ असा पराभव पत्करला. त्यामुळे तिची वाटचाल खंडित झाली. रविवारी ऋतुजा आणि अर्जुन मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. ऋतुजाचा रौप्यपदक विजेत्या संघातही समावेश होता. त्यामुळे तिला यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिसरे आणि अर्जुनला दुसरे पदक जिंकण्याची संधी असेल

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa Double gold medals in tennis37th National Games Goa doubles Arjun-Poorav in men's doubles37th National Games Goa news
ShareTweetSend
Next Post
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघास रोमहर्षक विजयासह ऐतिहासिक सुवर्णपदक

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघास रोमहर्षक विजयासह ऐतिहासिक सुवर्णपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.