• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघास रोमहर्षक विजयासह ऐतिहासिक सुवर्णपदक

by pravin
November 4, 2023
in अन्य खेळ, जलतरण, नॅशनल गेम्स
Reading Time: 1 min read
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्र पुरूष संघास रोमहर्षक विजयासह ऐतिहासिक सुवर्णपदक
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पणजी (प्रतिनिधी):  पुरुष गटात शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत महाराष्ट्र पुरूष संघाने सेनादलास पेनल्टी शूटआऊट (४-२)द्वारा १४-१२ (पूर्णवेळ १०-१०) असे पराभूत केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ २६ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरी पोहोचला होता. महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने कांस्यपदक मिळवताना कर्नाटक संघाचा १५-६ असा धुव्वा उडवला.

महाराष्ट्र व सेनादल यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. सुरुवातीला ३-६ अशा पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र सरकारने उत्तरार्धात धडाकेबाज खेळ करीत पूर्ण वेळेत १०-१० अशी बरोबरी झाली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्राने ४-२ असा विजय मिळविला त्याचे श्रेय महाराष्ट्राचा गोलरक्षक मंदार भोईरला द्यावे लागेल.

त्याने अप्रतिम गोलरक्षण करीत सेनादलाच्या दोन खेळाडूंना पेनल्टीद्वारा गोल करण्यापासून वंचित ठेवले. पेनल्टी शूट आउट मध्ये महाराष्ट्र संघाकडून अश्विनीकुमार कुंडे, पियुष सूर्यवंशी, श्रेयस वैद्य व उदय उत्तेकर यांनी यशस्वी गोल केला.

महाराष्ट्र महिला संघाने कांस्यपदकाच्या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी कर्नाटकविरुद्ध १५-६ असा विजय मिळवला. त्याचे श्रेय कोमल किरवे (पाच गोल), मानसी गावडे (चार गोल) व राजश्री गुगळे (तीन गोल) यांना द्यावे लागेल. महाराष्ट्र संघाने पूर्वार्धात ९-३ अशी आघाडी घेतली होती.

Tags: 37th National Games Goa37th National Games Goa news37th National Games Goa water poloA historic gold medal for the Maharashtra men's team in water polo with a thrilling winteam in water polo with a thrilling win
ShareTweetSend
Next Post
भिकन अंबे यांची 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघा चे मॅनेजर म्हणून निवड

भिकन अंबे यांची 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सायकलिंग संघाचे मॅनेजर म्हणून निवड

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.