छत्रपती संभाजीरनगर (प्रतिंनिधि): नुकतीच शुक्रवार रोजी जिल्हा क्रीडा परिषद,छत्रपती संभाजीरनगर यांची बैठक दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 25/07/2025 रोजी त्यांचे दालणामध्ये संपन्न झाली. सर्व प्रथम मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. बाजीराव देसाई जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मागणीला यश जिल्हास्तर स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त संघ,खेळाडू यांना पदके व चषक प्रदान करण्याकरीता बैठकीमध्ये चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. सदरील बैठकीमध्ये दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांचे शुभहस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मार्गदर्शक पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सन 2025-26 आयोजनाबाबत समितीसमोर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
ऑनलाईन प्रणालीमध्ये जिल्ह्याच्या क्रीडा विकासाबाबत प्रत्येक शाळेतील क्रीडा विषयक सोई सुविधांचे करण्यास समितीची मान्यता मिळाली. तालुका,जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तर स्पर्धांचे आयोजन नियोजन करण्यासाठी पंच म्हणून नियुक्ती पत्र दिल्यानंतर शाळेतून कार्यमुक्त करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्र देण्याचे आदेशीत करण्यात आले.
याप्रसंगी बैठकीकरीता जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगरचे सदस्य एस.एस. देशमुख, पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, श्रीमती डी.टी. शिरसाट, विस्तार अधिकारी, प्रतिनिधी शिक्षणाधिकारी माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर, डॉ.उदय डोंगरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी , गोकुळ तांदळे सचि जिल्हा सॉफ्टबॉल संघटना, प्रपित मोघे, बँक ऑफ महाराष्ट्र (लिड बँक), जिल्हा माहिती अधिकारी प्रतिनिधी यशोदा ताढे, बाजीराव देसाई,जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मुकूंद वाडकर, तालुका क्रीडा अधिकारी, सोयगाव, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा अधिकारी, सुजाता गुल्हाणे,डॉ. रेखा परदेशी, खंडू यादवराव, राम मायंदे, क्रीडा मार्गदर्शक पुनम नवगिरे, शिल्पा मोरे, तुषार आहेर आदीची उपस्थित होते.
अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खंत व्यक्त केली की, मला मैदानावर खेळाडू खेळतांना दिसत नाही याचधर्तीवर महोदय यांनी माहे ऑगस्ट 2025 मध्ये सर्व जिल्ह्यातील शाळेमध्ये खेळ व खेळाचे महत्व कसे पटवून सांगता येईल. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये एकाच दिवशी 1 तासाचे व्याख्यानचे आयोजन करण्याचे व क्रीडा खात्यामार्फत खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या क्रीडा सुविधा व योजना हे प्रत्येक खेळाडू पर्यंत कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले.
शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांना असे आदेशीत केले की, तालुकास्तर, जिल्हा स्तर सर्व शाळांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे अनिवार्य करावे या आशयाचे पत्र सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना देण्याचे आदेशीत करण्यात आले.





