• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

महिलांची ‘आयपीएल’ लवकरच!

by pravin
February 8, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

नवी दिल्ली – पुरुषांप्रमाणेच महिलांची पूर्ण स्वरूपातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच खेळवण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे BBCI (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दिले.

महिला क्रिकेटचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्ये सर्वप्रथम पुरुषांच्या ‘आयपीएल’दरम्यानच महिलांचा ट्वेन्टी-२० सामना खेळवला. त्या वेळी सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स हे दोन संघ त्या लढतीत खेळले. त्यानंतर २०१९ मध्ये व्हेलोसिटी संघाची भर पडल्याने या तीन संघांच्या स्पर्धेला ‘महिला ट्वेन्टी-२० चॅलेंज’ असे नाव देण्यात आले. या दोन्ही वेळेस हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघ जिंकला. मग नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या अखेरच्या पर्वात स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने सुपरनोव्हाजला नमवून पहिले जेतेपद पटकावले. तर मिताली राजच्या नेतृत्वाखालील व्हेलोसिटी संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

गतवर्षी या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही. परंतु गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाने ट्वेन्टी-२० प्रकारात चमकदार कामगिरी केल्यामुळे भविष्यात तीनऐवजी पुरुषांप्रमाणेच आठ अथवा किमान सहा संघांची ‘आयपीएल (’IPL ) खेळवण्यात यावी, अशी मागणी महिला संघातील खेळाडू, चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी केली. त्यातच आता या वर्षात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाल्यामुळे महिलांच्या ‘आयपीएल’ आयोजनाची शक्यता बळावली आहे.

महिलांच्या ‘आयपीएल’साठी चाहत्यांमध्ये दिसून येणारा उत्साह नक्कीच कौतुकास्पद आहे. (बीसीसीआय)BBCI’ पुढील वर्षाच्या प्रारंभी भारतातच ही स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहे. यामुळे देशातील असंख्य युवा महिला क्रिकेटपटूंना कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. तसेच अधिक परदेशी खेळाडूंच्या समावेशामुळे महिला क्रिकेटचा आपोआप प्रसार होईल, असे शहा म्हणाले. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीनेसुद्धा शहा यांच्या मताला दुजोरा दिला आहे.

Tags: CricketIPL-Soonwomens
ShareTweetSend
Next Post

गैरसमजामुळे माझ्याबाबत चिंता!टेनिसपटू पेंग

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.