• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

व्हिएतनामवरील विजयाने जपान उपांत्यपूर्व फेरीत

by pravin
January 24, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, फुटबॉल, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पुणे (प्रतिनिधी)  गतविजेत्या जपानने आपल्या  सातत्यपूर्ण कामगिरीने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज झालेल्या सी गटातील दुसऱ्या सामन्यात जपानने व्हिएतनामचा ३-० गोलने पराभव केला.

या विजयाने जपाने दोन सामन्यातील दोन विजयाने सहा गुण झाले. यामुळे जपान आणि कोरिया संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोरियाने या आधी झालेल्या सामन्यात म्यानमारचा २-० गोलने पराभव केला. गटातील दोन अव्वल संघ या नात्याने त्यांनी आपली आगेकूच कायम राखली.

दोन पूर्व आशियाई प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेला हा सामना गटविजेता निश्चित करणारा होता. आता सर्वोत्तम तीन संघातून बाद फेरी गाठण्यासाठी व्हिएतनामला अखेरच्या साखळी सामन्यात म्यानमारला चांगल्या फरकाने हरवावे लागेल.

जपानने यापूर्वी  २०१४ आणि २०१८ मध्ये या स्पधेर्चे विजेतेपद मिळविले आहे. त्यांची आजची सुरवात त्यांच्या लौकिकाला साजेशी अशीच होती. पहिल्या सामन्यात त्यांनी म्यानमारचा ५-० गोलने पराभव केला होता. सहाजिकच या विजयाने त्यांचा आत्मविश्वास अधिक उंचावला होता. मुख्य प्रशिक्षक फुतोशी इकेडा यांनी त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये केवळ कर्णधार साकी कुमागई, रिसा शिमिझु आणि मिना तनाका या तिघींनाच कायम ठेवले. या व्यतिरक्त पूर्ण नवा संघ खेळवूनही त्यांचे सामन्यावरील वर्चस्व कुठेही कमी झालेले नव्हते.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला त्यांना गोल करण्याची संधी निर्माण केली होती. युई नारुमिया हिला रुका नोरीमात्सु हिच्याकडून सुरेख पास मिळाला होता. पण, ती लक्ष्य साधू शकली नाही. नादेशिको हिच्या सततच्या आक्रमणाने व्हिएतनामची बचावफळी त्रस्त झाली होती. पण, सामन्याच्या ३८व्या मिनिटाला व्हिएतनामची गोलरक्षक त्रान थी किम हिने हना ताकाहाशी हिचा प्रयत्न हाणून पाडला. पण, नारुमियाने नंतर अगदी जवळून जाळीचा भेद घेत जपानला आघाडीवर नेले.

उत्तराधार्नंतर पाचच मिनिटांनी कुमागई हिने दुसरा गोल केला. तिचा हा गोल म्हणजे सर्वात वेगवान कृती होती. तनाकाचा हेडर मैदानात रिबाऊंड होऊन परत आल्यावर काही कळायच्या आत कुमागई हिने गोल केला. कुमागई हिच्या विलक्षण कामगिरीनंतर आठच मिनिटांनी नादेशिको हिने जपानचा तिसरा गोल केला. नादेशिको हिने कॉर्नर किकवर गोलकक्षाच्या मध्यातून सुरेख हेडरकरून हा गोल केलाव्हिएतनामने अखेरच्या २० मिनिटांत कमालीचा खेळ केला. फाम हई येन हिने ७५व्या मिनिटाला गोल करण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण, जपानची गोलरक्षक मोमोको तनाका हिने तेवढ्याच सफाईने तिचा प्रयत्न परतवून लावला.

Tags: Japanquarter-finalsWOMEN AFC
ShareTweetSend
Next Post

टी२० विश्वचषकात पाकिस्तान पुन्हा भारताला हरवेल; अख्तर

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.