• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

दुःखद घटना ! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, अहमदनगरमधील घटना

by pravin
December 11, 2021
in क्रिकेट, बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अहमदनगर- क्रिकेटविश्वात अनेकदा विविध गोष्टी घडताना दिसतात. काही आनंद देणाऱ्या असतात, तर काही दु:ख देणाऱ्या असतात.  अशी एक दुखद घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात घडली आहे. या गावातील एका तरूण क्रिकेटपटूचा सरावानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकेश अर्जून ढोबळे असं मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव असून तो कोपरगावमधील गजानन नगर येथे राहात होता. तो गुरुवारी (९ डिसेंबर) शहरातील साई सिटी येथील क्रिकेट मैदानात सीजन बॉलने सराव करण्यासाठी गेला होता. तो या ठिकाणी नेहमी सराव करायचा. मात्र, गुरुवारी अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार त्याने केली.

त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्याची प्रकृती ढासळत गेली. त्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण तिथेही काही कारणात्सव त्याच्यावर उपचार होऊ न शकल्याने त्याला कोपरगामधील मानवता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने तोपर्यंत अखेरचा श्वास घेतला.

लोकेश अर्जून ढोबळे याचे २७ वय होते. इतक्या कमी वयात जीव गमवावा लागल्याने संपूर्ण अमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.यापूर्वीही अशा घटना अनेकदा समोर आल्या आहेत, ज्यात सामना सुरु असताना एखाद्या खेळाडूला हृदयविकाराचा झटका आल्याने जीव गमवावा लागला आहे.

ShareTweetSend
Next Post

मणिपूर संघाचा गोलांचा पाऊस, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ५ सामन्यात ७४ गोल

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.