• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारताचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ;

by pravin
March 11, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

हॅमिल्टन : सलामीवीरांसह मधल्या फळीने केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडकडून ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला. उपकर्णधार हरमनप्रीत कौरने (६३ चेंडूंत ७१ धावा) भारताचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.

हॅमिल्टन येथे झालेल्या या दुसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ४६.४ षटकांत १९८ धावांत आटोपला. मिताली राज (५६ चेंडूंत ३१) आणि यास्तिका भाटिया (५९ चेंडूंत २८) यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलण्यात अपयश आले. त्याशिवाय त्यांनी चेंडू वाया घालवल्यामुळे मधल्या फळीवरील दडपण वाढले. सलामीवीर स्मृती मानधना (६), दीप्ती शर्मा (५) यांनी निराशा केली. शफाली वर्माला वगळण्याचा निर्णयही भारताला महागात पडला. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ली ताहुहूने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

प्रथम फलंदाजी करताना अ‍ॅमी सॅटर्थवेट (७५), अमेलिया कर (५०) आणि कर्णधार सोफी डिव्हाइन (३५) या त्रिकुटाने दिलेल्या योगदानामुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ९ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. एक वेळ न्यूझीलंडचा संघ ४० षटकांत ४ बाद २१२ धावा अशा सुस्थितीत होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध फटकेबाजी करणारी अष्टपैलू पूजा वस्त्रकारने या वेळी गोलंदाजीत कमाल दाखवली. तिने ३४ धावांत चार बळी पटकावून न्यूझीलंडच्या धावसंख्येला लगाम लावला.

फेब्रुवारीत झालेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारतावर ४-१ असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारताला या वेळी पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र सांघिक कामगिरी करण्यात भारतीय महिला अपयशी ठरल्या. दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत (तीन सामन्यांत चार गुण) दुसरे स्थान पटकावले, तर भारतीय संघ दोन लढतींमधील दोन गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. शनिवारी भारताची वेस्ट इंडिजशी गाठ पडेल.

 

Tags: CricketPlay
ShareTweetSend
Next Post

बेंझेमाच्या हॅट्ट्रिकमुळे रेयाल माद्रिदची मेसीच्या पॅरिस सेंट-जर्मेनवर सरशी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.