• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

चॅम्पियन संघ ठरला मास्टर्स ट्रॉफी -2022 चा मानकरी;

by pravin
March 15, 2022
in बास्केटबॉल
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद -(प्रतिनिधी )मास्टर्स ग्रुप ऑफ बास्केटबॉल वतीने चॅम्पियन क्रीडा मंडळ, स्व. प्रभाकरजी पांडे क्रीडांगण,विद्युत कॉलनी, बेगमपुरा बास्केटबॉल मैदान येथे या वर्षी देखील 25 ते 40 वयोगटातील पुरुषांकरीता आयोजित बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम साम सामन्यात चॅम्पियन संघाने मास्टर्स ग्रुप संघाला 59 विरुद्ध 51अशा गुण फरकाने नमवून मास्टर्स ट्रॉफी -2022 चा मानकरी ठरला.अत्यंत चुरशीच्या आणि अंगावर शहारे आणनाऱ्या सामन्यांत चॅम्पियन संघा मध्ये भारतीय सेना खेळाडू गणेश गायके , राष्ट्रीय खेळाडू अनिरुद्ध पांडे, संदीप ढंगारे, महेश इंगळे, अंकुश सोनी यांनी अफलातून खेळ करत चपळाईच्या जोरावर मास्टर्स ग्रुप संघावर मात केली.

मास्टर्स ग्रुप संघाकडून आकाश खोलवाल, आकाश खरात , आसिफ शेख, विजय पिंपळे, प्रशांत बुरांडे आणि सचिन म्हस्के यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. पंचाची भूमिका गणेश कड, मनजितसिंग दरोगा आणि संदीप सातदीवे यांनी निभावली.

तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात एस.एफ.एस संघाने आर.बी.बी.सी संघावर 48 विरुद्ध 35 अशा गुण फरकाने विजय मिळविला. विजयी संघाकडून अक्षय देवकर, अभिजित लिंभोरे,धवल मोरे, विशाल बकाल,अजय सोनटक्के यांनी जलद गतीने खेळ केला आणि विजयश्री खेचून आणली. तर पराभूत संघातर्फे विजय गाडे, अफरोज खान, सागर कापडणे, प्रदीप भालेराव आणि संदीप सातदिवे यांनी आपले कसब पणाला लावले. पंचांची भूमिका प्रदीप लाटे आणि सत्यजित परदेशी यांनी निभावली.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी चंद्रकांत सोनवणे, विनायक (गणू) पांडे उपजिल्हाप्रमुख शिवसेना , बास्केटबॉल संघटनेचे पदाधिकारी . ॲड संजय डोंगरे, गणेश कड, मनजितसिंग दरोगा, अतुल कुलकर्णी, ज्ञानेश्वर जगताप, संदीप जाधव आदी उपस्थित होते.प्रमुख

अतिथिचे स्वागत स्पर्धा आयोजन समितीचे प्रशांत बुरांडे, संदीप ढंगारे, विजय पिंपळे आणि सचिन म्हस्के यांनी झाडांचे रोपटे देऊन केले.

अड.संजय डोंगरे यांनी आगामी येत्या महिन्यात 21 वर्षाखालील मुलांची बास्केटबॉल प्रीमियर लीग स्पर्धा आयोजन करण्याचे आश्वासन दिले तर विनायक (गणू) पांडे यांनी कै.मोहन पांडे यांच्या स्मरणार्थ निमंत्रीतांच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले.

विजयी, उपविजयी संघाला प्रमुख अतिथिंच्या हस्ते मास्टर्स ट्रॉफी सह रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणेश गायके यांना गौरविण्यात आले.

चॅम्पियन क्रीडा मंडळ वतीने आयोजीत १२ वर्षाखालील इंटर हाउस स्पर्धेमधील विजयी खेळाडूंना देखील बक्षिसे देण्यात आली.

तसेच नांदेड येथील निमंत्रितांच्या अखिल भारतीय स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात प्रथम स्थान पटकाविलेल्या एम.एस.एम संघातील खेळाडू आणि मुलींच्या गटात तिसरे स्थान पटकाविलेल्या चॅम्पियन संघातील खेळाडूंना मास्टर्स ट्रॉफी समिती मार्फत टी शर्ट देऊन सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन नसरीन बानो मोसीन पठाण आणि संदीप ढंगारे यांनी केले.

यावेळी वरिष्ठ खेळाडू सुशांत शेळके, शिवाजी शिंदे, संदीप क्षीरसागर, अजय सोनटक्के, धवल मोरे, संदीप सातदिवे, सुमेध जाधव,गणेश तुपे, विशाल बकाल सचिन शेळके आदी उपस्थित होते.

मास्टर्स ट्रॉफी समितीचे प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे, संदिप ढंगारे आणि सचिन म्हस्के यांनी आगामी 2023 वर्षात मराठवाडा स्तरावर मास्टर्स ट्रॉफी -2023 चे आयोजन करण्यात येईल असे कळविले.

 

स्पर्धा यशस्वी होण्या करीता महेश इंगळे,राजू कानिसे,गजानन दीक्षित, मोसिन पठाण,प्रदीप लाटे, नरेंद्र चौधरी, जय तिवारी, सत्यजित परदेशी आणि सागर धटींग आदीनी प्रयत्न केले आहे.

Tags: Champion teamFootballwin
ShareTweetSend
Next Post

श्रेयसच्या कामगिरीने प्रभावित -रोहित;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.