• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ब्राह्मण प्रीमियर लीग स्पर्धेला धडाक्यात सुरुवात

by pravin
April 3, 2022
in क्रिकेट, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): ब्राह्मण समाजातील खेळाडूंना आणि युवकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक एकत्रीकरणाच्या भावनेतून सुरु करण्यात आलेल्या ब्राह्मण प्रीमियर लीग २०२२ क्रिकेट स्पर्धेला धडाक्यात प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेचे उदघाटन एमआयटी महाविद्यालय आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील मैदानावर गुढी उभारून पार पडले.

दोन ते नऊ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या ब्राह्मण प्रीमियर लीग २०२२ या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून त्यांच्यात एकूण ३३ सामन्यांची स्पर्धा खेळवली जाणार आहे. यातील अंतिम सामना हा नऊ एप्रिल रोजी पार पडणार आहे. एमआयटी महाविद्यालय मैदानावरील उदघाटन सोहळा मंगेश पळसकर यांची हस्ते पार पडला.

यावेळी पुष्कर वैद्य, आदित्य नाईक, शिरीष बोराळकर, ऍड. निनाद खोचे, अनिकेत लाटे उपस्थित होते. औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या उदघाटन सोहळ्याला मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, लक्ष्मीकांत थेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामन्यांच्या नंतरचे बक्षीस वितरण अनिरुद्ध मोहनपूरकर, अजिंक्य कुलकर्णी, अमेय एकबोटे, गौरव पाठक, डॉ. स्वप्नील कुलकर्णी, स्वानंद आनंदगावकर यांची उपस्थिती होती. स्पर्धेच्या पाहिल्या दिवशी युनिव्हर्सल इलेव्हन, पेनल्टी टायगर्स, ओम मृत्युंजय, वज्र या संघानी प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धेतील आपले आव्हान मजबूत केले. सामन्यांच्या यशस्वीतेसाठी श्रीनिवास देव, शिवम पांडे, निलेश सेवेकर, प्रसाद बोर्डे, आदींनी परिश्रम घेतले.

Tags: The Brahmin Premier League started in earnest
ShareTweetSend
Next Post

ॲथलेटिक्सच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.