• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा;छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक संघास विजेतेपद

by pravin
June 29, 2025
in तलवारबाजी, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी):  छत्रपती संभाजीनगर  जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वी मिनी व. ६ वी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दहा वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले, तर सोलापूर ने दहा वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद त्याचप्रमाणे बारा वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद संपादन केले. याचबरोबर बारा वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिक जिल्ह्याने विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण मा.आमदार विक्रम काळे (शिक्षक मतदार संघ) व भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला . याप्रसंगी राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, श्री. बंडू सोमवंशी (सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ),अशोक दुधारे , प्रकाश काठोळे, मा.अशोक कदम (अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ) जिल्हा संघटनेचे एस पी जवळकर , दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान जालना जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी संजय गाढवे, श्री विजय वानखेडे व श्री विष्णू नीळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुकाराम मेहत्र,अजय त्रिभुवन सागर मगरे शिल्पा नेने तुषार आहेर, विजय गाडेकर ,पिराजी कुसळे, सुशील अंभोरे, राहुल दणके , जयदीप पांढरे, गौरव गोटे ,अमृता भाटी,विशाल दानवे आदी परिश्रम घेतले. स्पर्धेचा आजचा निकाल खालील प्रमाणे.

बारा वर्षाखालील फाईल मुले
कवीश उत्तेकर (पुणे )
सूर्य यादव (नाशिक)
सक्षम जाधव (पुणे)
चिरायू पाटील (नाशिक)

बारा वर्षाखालील फाईल मुली
रायना रवेशिया (मुंबई उपनगर)
अनन्या सुळे (नाशिक)
आराध्या कुंभार (नाशिक)
मोक्षिता केसरकर (नाशिक)

दहा वर्षाखालील सेबर मुले
रुद्र आहेवाढ (संभाजीनगर)
शिव निळ (संभाजीनगर)
श्रीराज पोळ (सातारा)
निळ सुरावशे (सोलापूर)

दहा वर्षाखालील सेबर मुली
साईलीला पुलगाम (सोलापूर)
अनविता तजणे (नाशिक)
अनघा घोरपडे ( छ संभाजीनगर)
राव्या सोनटक्के ( अमरावती)

बारा वर्षाखालील सेबर मुली
शरण्या डेरले (नाशिक)
अर्शिया शेट्टी (रायगड)
दिव्यांशी धरपुरा (नागपूर)
तेजस्विनी साखरे (सोलापूर)

बारा वर्षाखालील सेबर
प्रज्वल सातरे (अहिल्यानगर)
शिरीष शातगर(सोलापूर)
ओजस वाघ ( हिंगोली)
रुद्र अहवाल ( छ संभाजीनगर)

स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद
दहा वर्षाखालील मुले
प्रथम : छत्रपती संभाजीनगर
द्वितीय: मुंबई उपनगर
तृतीय : रायगड

दहा वर्षाखालील मुली
प्रथम :सोलापूर
द्वितीय :पुणे
तृतीय :लातूर

बारा वर्षाखालील मुले
प्रथम:सोलापूर
द्वितीय पुणे
तृतीय : अहिल्यानगर

बारा वर्षाखालील मुली
प्रथम: नाशिक
द्वितीय : लातूर
तृतीय : मुंबई उपनगर

Tags: Maharashtra State Fencing Association newsNashik teams win titlesSolapurState level fencing competition news Chhatrapati Sambhajinagar
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.