• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

स्क्वॉश खेळाडूंची विजयी सलामी:उर्वशी जोशी, अंजली सेमवाल, ओम सेमवाल, राहुल बैठा दुस-या फेरीत

by pravin
October 1, 2022
in नॅशनल गेम्स, स्क्वॉश
Reading Time: 1 min read
नॅशनल गेम्स २०२२; स्क्वॉश स्पर्धेत महाराष्ट्राचे महिला, पुरुष संघ उपांत्य फेरीत

ओम सेमवाल, सूरज चंद, राहुल बैठा, यज्ञेश्वर बागराव, प्रियांका मंत्री, अंजली सेमवाल, जींत वैठी, सुनीता पटेल, उर्वशी जोशी, मोहित भट्ट आणि प्रदीप खांद्रे

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या उर्वशी जोशी, अंजली सेमवाल, ओम सेमवाल आणि राहुल बैठा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे.महाराष्ट्र स्क्वॉश संघाकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. त्यानुसार पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी विजयी सलामी देत आगेकूच केली आहे.

महिला गटात उर्वशी जोशी हिने चंदीगडच्या निधी देवनांगचा 3-0 असा सहज पराभव करुन दुसरी फेरी गाठली. अंजली सेमवाल हिने बिहारच्या सोनी कुमारीवर 3-0 असा सहज विजय साकारला.पुरुष गटात ओम सेमवाल याने झारखंडच्या शिवेश कनोईचा 3-0 ने सहज पराभव केला. राहुल बैठा याने आसामच्या सुजल पाठकला 3-0 ने हरवले. सुरज चंदला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

महाराष्ट्र स्क्वॉश संघास प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव, प्रियांका मंत्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अपेक्षेप्रमाणे खेळाडूंनी विजयी सुरवात केली आहे. खेळाडू आपली लय कायम ठेवत फायनलपर्यंत मजल मारतील असा विश्वास प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे यांनी पहिल्या फेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

Tags: 36th National Games36th National Sports Tournament News SquashAnjali SemwalJeent VaithiMohit Bhatt and Pradeep KhandreOm SemwalPresident of Maharashtra Squash Association Dr. Pradeep KhandrePriyanka MantriRahul BaithaSquashSunita PatelSuraj ChandUrwashi JoshiYadnyeshwar Bagrao
ShareTweetSend
Next Post
महाराष्ट्राच्या मयुरी लुटेला सायकलिंगमध्ये कांस्यपदक

महाराष्ट्राच्या मयुरी लुटेला सायकलिंगमध्ये कांस्यपदक

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.