• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोचे अनावरण

by pravin
August 31, 2021
in बातम्या
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद : क्रीडा विश्वातील घटना-घडामोडी वाहिलेल्या स्पोर्ट्स पॅनोरमा, या माध्यमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिनांक 29 ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आला. क्रीडा विश्वासाठी हक्काचं व्यासपीठ असलेलं हे माध्यम मासिक, वेब पोर्टल आणि चॅनलच्या रूपात वाचकांच्या भेटीला येत आहे.

स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमास औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे,प्रा.श्याम तळेगावकर, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, औरंगाबाद स्क्वॅश संघटना अध्यक्ष प्रदीप खांडरे, स्पोर्ट्स पॅनोरमाचे संपादक प्रवीण वाघ, एआयएन न्यूजचे संपादक संतोष आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर या मान्यवरांनी स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोसह, संकेतस्थळाचे अनावरण केले. याप्रसंगी पंकज भारसाखळे म्हणाले की, क्रीडा विश्वातील चालू घडामोडीसह खेळातील समस्या मांडण्यासाठीतसेच त्या समोर आणण्यासाठी  स्वतंत्र माध्यमाची आवश्यकता होती. ती उणीव स्पोर्ट्स पॅनोरमा, या माध्यमाने भरून काढली.  खेळाचा विकास होतोय.या विकासाला चालना देण्याचे काम स्पोर्ट्स पॅनोरमा करेल, असा विश्वास  यांनी जागवला. क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे म्हणाले की, हे माध्यम शासनाचे क्रीडा धोरण खेळाडूंसह लोकांपर्यंत नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. खेळासाठी शासनाने आणलेल्या योजना आता जलद गतीने या माध्यमातून लोकांपर्यंत जातील. म्हणून क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या माध्यमाचे स्वागतच आहे, असे श्री. घुगे म्हणाले. या प्रसंगी एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल संचालक तुकाराम मुंडे व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादकीय मंडळातील भास्कर लांडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक,खेळाडू व संघटनांच्या वतीने शुभेच्छा  देण्यात आल्या आहेत.

ShareTweetSend
Next Post

क्रीडा भारतीतर्फे खेळाडूंचा व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.