• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

श्रेयस अय्यरनं मोडला विराट कोहलीचा ‘मोठा’ रेकॉर्ड

by pravin
February 28, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

श्रेयसनं तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७३ धावा केल्या,भारताने तिसर्‍या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-०ने जिंकली. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही. तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाबाद ७३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. यासह अय्यरने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. अय्यर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या मालिकेत त्याने तीन डावात एकूण २०४ धावा केल्या आहेत.

 

२०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराट कोहलीने १९९ धावा केल्या होत्या. यापूर्वी कोहलीने २०१९मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात २८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात अय्यरने ४५ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.

फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १९ चेंडू आणि सहा गडी राखून पराभव केला. भारताने आता अफगाणिस्तानच्या सलग १२ टी-२० विजयाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

Tags: CricketShreyas IyerVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

हरमनप्रीतचा इशारा ; भारतीय महिला संघाचा दोन धावांनी निसटता विजय

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.