• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 23, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शंतनू ,अजयसिंग, अनिशची आशिया कप व साऊथ आशियाई ट्रायथलॉन चॅम्पियनशिपसाठी निवड

by pravin
March 31, 2022
in अन्य खेळ, आंतरराष्ट्रीयस्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद(प्रतिनिधी): पोखरा (नेपाळ) येथे ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या आशिया ट्रायथलॉन कप २०२२ व साऊथ आशियाई चॅम्पियनशिपसाठी औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेच्या शंतनू शुक्ला, अजयसिंग पाल आणि अनिश शुक्ला या तिघांची भारतीय संघात निवड झाली आहे. निवड झालेले हे तिघे मराठवाड्यातील पहिलेच ट्रायथलॉनपटू आहे.

इंडियन ट्रायथलॉन फेडरेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेत शंतनू, अजयसिंग व अनिशने सुवर्ण कामगिरी करीत राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवला होता. हे तिनही खेळाडू एलिट मेन प्रकारात १५०० मी.स्विमिंग, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी रनींग करत पदकाचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतील. या ट्रायथलॉनपटूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अभय देशमुख यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले आहे.

पोखरा येथील स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड, कझाकिस्तान, जपान, पोलंड, बांगलादेश, ऑस्ट्रिया इतर देशांचा समावेश आहे. या तिघांच्या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे, महाराष्ट्र ट्रायथलॉनचे डॉ. दयानंद कुमार, राजेंद्र निंबाळते, अशोक काळे, नामदेव सोनवणे, संदीप चव्हाण, सचेंद्र शुक्ला, डॉ.संदीप जगताप, तांत्रिक प्रमुख डॉ.प्रफुल्ल जटाळे, अंकुशसिंग पाल, डॉ.सुनील देशमुख, निखिल पवार, अजय दाभाडे, नितीन बोंद्रे, अशोक वाघ आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Tags: Ajay SinghAnish selected for Asia Cup and South Asian Triathlon ChampionshipsShantanu
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला विजेते पदासह ११ सुवर्ण,०५ रौप्य,०५ कास्य पदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.