• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये शाहरुख ,चंचल,आदित्य आणि वैशाली विजयी

by pravin
August 8, 2022
in ॲथलेटिक्स, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये शाहरुख ,चंचल,आदित्य आणि वैशाली विजयी
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

संभाजीनगर (प्रतिनिधी): टोक्यो ओलंपिकमध्ये ७ ऑगस्टला भारताच्या नीरज चोप्रा ने भालाफेक या ॲथलेटिक्सच्य क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. नीरज चोप्राची ही कामगिरी सर्व उदयनूक खेळाडूंना प्रेरणा देत राहावं

याकरिता भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या वतीने देशभर ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्या ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव पंकज भारसाखळे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, उपप्राचार्य डॉ.माधव गायकवाड, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून दीडशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचा निकाल

पुरुष खुला गट- प्रथम: शाहरुख शेख, द्वितीय: रवींद्र थोरे, तृतीय: तुषार शिंदे. महिला खुला गट- प्रथम: चंचल देवकर, द्वितीय: दिव्या इंगळे, तृतीय: दिशा जोशी. वीस वर्षा आतील मुले प्रथम:- आदित्य नरवडे, द्वितीय:- अभिषेक गदादे, तृतीय:- संदेश फोलाने. वीस वर्षा आतील मुली, प्रथम :- वैशाली लिंगायत, द्वितीय:- योगिता कदम, तृतीय :- खुशी फत्तेलष्कर.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॲथलेटिक्सचे तांत्रिक समितीचे प्रमुख डॉ. दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रबोधिनीच्य प्राचार्य पुनम नवगिरे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, डॉ.सचिन देशमुख, डॉ.राम जाधव, डॉ.सुहास यादव, प्रा.मधुकर वाकळे, भरत रेडी, प्रा.राहुल अहिरे आणि तुषार खेडकर यांनी परिश्रम घेतले. तर संपूर्ण स्पर्धेचे समालोचन प्रा. अमृत बिराडे यांनी केले.

 

Tags: Javelin Throwing latest NewsJavelin Throwing News AurangabadLatest sports newslatest sports news marathiMarathi sports news
ShareTweetSend
Next Post
स्पोर्ट्स पॅनोरमा इम्पॅक्ट; संभाजीनगर क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियावर हातोड

स्पोर्ट्स पॅनोरमा इम्पॅक्ट; संभाजीनगर क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियावर हातोडा

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.