• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 22, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

दुःखद! दिग्गज हॉकीपटू चरणजीत सिंह यांचे निधन

by pravin
January 27, 2022
in हॉकी
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

१९६४ सालच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंह (Charanjit Singh) यांचे आज ( दि. २७ ) निधन झाले. हिमाचल प्रदेशमधील उनामध्ये राहत्या घरी त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. भारताचे हे माजी मिड फिल्डर ९० वर्षाचे होते. पुढच्या महिन्यातच त्यांचा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. चरणजीत यांना पाच वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता.

दरम्यान, चरणजीत सिंह यांचे चिरंजीव व्ही. पी. सिंह (V. P. Singh) यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘पाच वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांची हालचाल मंदावली होती. ते काठीच्या सहाय्याने चालत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. आज सकाळी ते आपल्याला सोडून गेले.’ व्ही. पी. सिंह पुढे म्हणाले की, माझी बहीण उनामध्ये आल्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

1964 च्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हॉकी (Hockey) संघाचे नेतृत्व करण्याबरोबरच चरणजीत हे १९६० च्या ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या संघाचेही भाग होते. याचबरोबर १९६२ च्या एशियन गेम्समधील रौप्य पदक विजेत्या संघातही त्यांचा समावेश होता. (1964 Tokyo Olympics gold medal-winning hockey team Captain Charanjit Singh)

Tags: charanjit singhDiedHockeyteam captiontokyvo olympics gold medalwinning
ShareTweetSend
Next Post

U.P. योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण आमने-सामने ; आज रात्री 7:30 वाजता

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.