• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 23, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

NEET आंदोलनावर ‘क्रिकेटचा देव’ बोलला; सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

by pravin
July 23, 2026
in अन्य खेळ, क्रिकेट, बातम्या
Reading Time: 1 min read
NEET आंदोलनावर 'क्रिकेटचा देव' बोलला; सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

 स्पोर्ट्स पॅनोरमा ब्युरो

दिल्लीतील कथित NEET परीक्षा गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना भारतरत्न आणि क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर एक भावनिक आणि विचारप्रवर्तक पोस्ट शेअर केली आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपासून दूर राहत, सचिनने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचे आणि प्रामाणिकपणा व गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन केले आहे.

“अपयश चालेल, पण फसवणूक नाही”

सचिनने आपल्या पोस्टमध्ये दिवंगत वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या शिकवणीचा उल्लेख करत लिहिले की, “माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी मला एक गोष्ट नेहमी शिकवली—अपयश आले तरी चालेल, पण फसवणूक करू नकोस. आयुष्यात कधीही शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नकोस.”

ही शिकवण आजही आपल्या आयुष्यात तितकीच महत्त्वाची असल्याचे सचिनने नमूद केले.

“विद्यार्थ्यांची निराशा समजण्यासारखी”

सचिनने विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. दिवसरात्र मेहनत करूनही योग्य संधी किंवा न्याय मिळत नसल्यास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारी निराशा स्वाभाविक असल्याचे त्याने म्हटले. “जेव्हा विद्यार्थ्यांना वाटते की त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळाले नाही, तेव्हा त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. पुन्हा अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.”

“गुणवत्तेचा विजय होणारी संस्कृती घडवूया”

सचिनने आपल्या पोस्टमध्ये आजच्या तरुण पिढीबद्दल आशावाद व्यक्त करत म्हटले की, भारताचा तरुण वर्ग स्वप्नांनी आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. हीच ऊर्जा देशाच्या प्रगतीचा पाया आहे.

त्याने पालक, शिक्षक, शाळा, प्रशासकीय यंत्रणा आणि समाजातील प्रत्येक घटकाने तरुणांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगितले.  “अशी संस्कृती निर्माण झाली पाहिजे, जिथे मेहनतीचा सन्मान होईल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळेल आणि गुणवत्तेचा विजय होईल.”

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सचिन तेंडुलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी तिचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत सकारात्मक आणि संयमी संदेश दिल्याबद्दल नेटकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे.

 

 

Tags: Cricket NewsEducation NewsHard WorkHonestyMeritNEET ExamNEET Paper LeakNEET ProtestNEET आंदोलनSachin Postsachin tendulkarSports PanoramaStudents Protestपेपरफुटीमराठी क्रीडा बातम्याविद्यार्थी आंदोलनसचिन तेंडुलकर
ShareTweetSend

ताज्या बातम्या

NEET आंदोलनावर 'क्रिकेटचा देव' बोलला; सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

NEET आंदोलनावर ‘क्रिकेटचा देव’ बोलला; सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक

NEET आंदोलनावर युवराज सिंगसह क्रिकेटविश्वातील प्रतिक्रिया; सोशल मीडियावर रंगली तीव्र चर्चा

NEET आंदोलनावर युवराज सिंगसह क्रिकेटविश्वातील प्रतिक्रिया; सोशल मीडियावर रंगली तीव्र चर्चा

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ : प्रमुख खेळ वगळल्याने भारताच्या पदक संख्येला मोठा फटका बसणार?

राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ : प्रमुख खेळ वगळल्याने भारताच्या पदक संख्येला मोठा फटका बसणार?

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.