• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रसेल फिफ्टी पॉवर; केकेआरचा आणखी एक दणदणीत विजय

by pravin
April 1, 2022
in आयपीएल, क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्जला केकेआरने धुव्वादार गोलंदाजीच्या बळावर केकेआरने १३७ धावांवर रोखले होते. ज्याचा पाठलाग करताना कोलकाताने ६ विकेट्सने सामना जिंकला.

सामन्यात गोलंदाजी करताना उमेश यादवने (umesh yadav) सामन्यात ४ विकेट्स घेत स्पर्धेत पर्पल कॅप आपल्या नावे केली. त्याने पंजाबच्या (PBKS) संघातील खेळाडूंना पळवून लावले. पंजाबकडून केवळ शेवटच्या फळीतील कागिसो रबाडा आणि ओरियन स्मिथ यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांच्या कामगिरीने पंजाब १३७ पर्यंत पोहचू शकला. वानखेडेच्या या फलंदाजी विकेटवर केकेआरच्या फलंदाजांनीही चांगली सुरुवात केली.

ANDRE RUSSELL. That's it. That's the tweet. 😍#AndreRussell #KKRHaiTaiyaar #KKRvPBKS #IPL2022 pic.twitter.com/nNOcYYhyrR

— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022

१३८ चा पाठलाग करताना सलामीची जोडी लवकर माघारी परतल्यावर केकेआरचा कर्णधार श्रेयस आणि सॅम बिलिंग्सने पारी सांभाळली. मात्र यानंतर पंजाबच्या राहुल चहरने श्रेयसची विकेट बघत दुसऱ्या चेंडूत नितेश राणालाही शून्यावर माघारी पाठवले. पंजाबचे राणाला बाद करणेच महागात पडले. कारण यानंतर फलंदाजीला आल्या आंद्रे रसेलने (andre russel) धुव्वादार बॅटिंग केली. त्याने ३१ चेंडूत ७० धावा करत आपल्या मसल पॉवरने केकेआरला आरामात सामना जिंकून दिला. या विजयासह कोलकाता आता पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आला आहे.

रसेलचे झंझावाती अर्धशतक

पंजाबकडून मिळालेले १३८ धावांचे आव्हान पूर्ण करताना, कोलकाताची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांमध्ये माघारी परतले. त्यानंतर राहुल चहरने एकाच षटकात दोन बळी घेत कोलकाताची अवस्था ४ बाद ५१ केली. त्यानंतर मात्र केवळ आंद्रे रसेल शो दिसला. त्याने ८ षटकारांचा पाऊस पडताना ३१ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा कुटल्या. त्याला सॅम बिलिंग्सने २४ धावा काढून साथ दिली. कोलकाताने केवळ १४.३ सटका मध्ये आव्हान पूर्ण केले. या विजयासह कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

Tags: ipl 2022IPL Indian premier leagueRussell Fifty Power; Another resounding victory for KKR
ShareTweetSend
Next Post

IPL 2022 : आर्यन खान,सुहाना खान सोबत अनन्या पांडे शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी चीअर करताना

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.