• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ग्रामीण पोलिस, मसीआ ब संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

by pravin
March 31, 2022
in क्रिकेट, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): गरवारे क्रिकेट संकुलावर सुरू असलेल्या कास्मो फिल्म प्रायोजित व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित ३० व्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात ग्रामीण पोलीस संघाने एमजीएम ‘अ’ संघावर ५२ धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात मसिआ ‘ब’ संघाने महावितरण ‘अ’ संघावर ९ गडी राखून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आजचा सामन्यात विकास नगरकर व मधुर पटेल सामनावीर ठरले.

पहिल्या लढतीत ग्रामीण पोलीस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १८२ धावा केल्या. यामध्ये अजय काळेने सर्वाधिक ३६ चेंडूत ५ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह ७२ धावा काढल्या. साहिल तडवीने ४९ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ४९ धावा तर विकास नगरकरने २३ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह २९ धावांचे योगदान दिले. एमजीएम ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार सागर शेवाळे, सय्यद जलीस, शेखर ताठे, रहीम खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमजीएम ‘अ’ संघ निर्धारित २० षटकांत १३० धावाच करू शकला. यामध्ये अमित पाठकने २५ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ४ चौकारांसह ४० धावा, सुमित लोंढेने ३२ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा, अमर असोलकरने १३ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह १७ धावा तर शेखर ताठे व अनिरुद्ध शास्त्री यांनी प्रत्येकी १५ धावांचे योगदान दिले. ग्रामीण पोलीस संघातर्फे गोलंदाजी करताना विकास नगरकरने केवळ १३ धावात ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. इम्रान लफ्ती व किरण लहाने यांनी प्रत्येकी २ गडी व श्रीकांत तळेगावेने ८ धावात १ गडी बाद केला.

मधुरचे अर्धशतक, रामचे चौघांना तंबूत पाठवले :
दुसऱ्या लढतीत महावितरण ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सर्वबाद ११७ धावा केल्या. यामध्ये सय्यद इनायत अलीने ३५ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह ३१ धावा, अब्दुल आतीक खानने २४ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा शाहेद सिद्दीकीने १८ चेंडूत १ चौकारासह १८ धावांचे योगदान दिले. मसीआ ‘ब’  संघातर्फे गोलंदाजी करताना राम राठोडने केवळ २२ धावात ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. गिरीष खात्रीने २१ धावात २ गडी, तर संदीप गायकवाड, पंकज फलके व  मंगेश नितुरकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसीआ ‘ब’ संघाने विजयी लक्ष १२ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये मधुर पटेलने अप्रतिम खेळी करताना केवळ ३७ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ११ चौकारांसह नाबाद ७० धावांची खेळी केली. त्याला साथ देत निकित चौधरीने २६ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ३३ धावा तर संदीप गायकवाडने १० चेंडूत २ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. महावितरण ‘अ’ संघातर्फे गोलंदाजी करताना कैलास शेळके यांनी एक मात्र गडी बाद केला.

Tags: 30th Shaheed Bhagat Singh T20 Cricket TournamentMasia B team enters the semifinalsRural Police
ShareTweetSend
Next Post

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला ३ राैप्य, ३ कांस्यपदके

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.