• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धांमध्ये हंगामांनंतर मुंबई उपांत्यपूर्व फेरीत;

by pravin
March 7, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

अहमदाबाद  -शाम्स मुलानीच्या (५/६४) प्रभावी फिरकीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाचा एक डाव आणि १०८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह मुंबईने ड-गटात सर्वाधिक १६ गुणांसह अग्रस्थान पटकावतानाच तीन हंगामांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठली.

 

मुंबईच्या पहिल्या डावातील २४८ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ओडिशाने ५ बाद ८४ धावांवरून चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. परंतु मुलानी आणि तनुष कोटियन (३/३१) या फिरकी जोडीने पुन्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना हैराण केले. त्यामुळे दिवसाच्या पहिल्या १५ षटकांतच एकूण १४० धावांवर ओडिशाचा संघ गारद झाला. मुंबईने डावाने विजय मिळवल्यामुळे बोनस गुणही कमावला. पहिल्या डावात १६५ धावांची खेळी साकारणारा सर्फराज खान सामनावीर ठरला. अन्य लढतीत सौराष्ट्रने गोव्याला नमवूनही १४ गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

मुंबईसह पंजाब, कर्नाटक, बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या संघांनीही आगेकूच केली. तर झारखंड आणि प्लेट गटाचे विजेते नागालँड यांच्यात उपउपांत्यपूर्व लढत १२ मार्चपासून होईल. त्यानंतर जूनमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील.

 

संक्षिप्त धावफलक

 

ओडिशा (पहिला डाव) : २८४

मुंबई (पहिला डाव) : ९ बाद ५३२ (डाव घोषित)

ओडिशा (दुसरा डाव) : ४२ षटकांत सर्व बाद १४० (अभिषेक राऊत ५९; शाम्स मुलानी ५/६४, तनुष कोटियन ३/३१)

Tags: CricketPlayRanjit trophy
ShareTweetSend
Next Post

प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.