• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत; BBCI ची योजना

by pravin
January 28, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

देशातील करोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

देशातील ३८ प्रथम श्रेणी संघांचा समावेश असलेली रणजी स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

बीसीसीआय’ची २७ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला (आयपीएल) प्रारंभ करण्याची योजना आहे. त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात खेळवणे कठीण आहे. त्यामुळे अनेक राज्य संघटनांच्या विनंतीवरून स्पर्धेच्या आराखड्यासाठी ‘बीसीसीआय’ने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते.

‘रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा आम्ही आढावा घेत आहोत. पुढील महिन्यात पहिला टप्पा आणि ‘आयपीएल’नंतर दुसरा टप्पा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे धुमाळ यांनी सांगितले. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत पहिला टप्पा आणि जून-जुलैमध्ये दुसरा टप्पा घेण्याबाबत ‘बीसीसीआय’ आग्रही आहे.

Tags: bbcicompetitionRanji-Trophy
ShareTweetSend
Next Post

आशिया चषक हॉकी स्पर्धा ; आज भारताची चीनशी लढत

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.