• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

कराटे संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण भोसले, प्रा. कैलास जाधव, सचिवपदी मुकेश बनकर, बळीराम राठोड यांची निवड

by pravin
March 14, 2022
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी)औरंगाबाद जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन आणि औरंगाबाद शहर कराटे असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे यांनी रविवारी घोषणा केली. जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. कैलास जाधव, कार्यध्यक्षपदी डॉ. संदीप जगताप व सचिपदी बळीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर, शहर संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण भोसले आणि सचिवपदी मुकेश बनकर यांची सर्वोनुमते निवड झाली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, संदीप वाघचौरे, अॅड. रेणुका घुले, सुयश नाटकर, श्याम अंभोरे आदींची उपस्थिती होती.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे :
जिल्हा – अध्यक्ष प्रा. कैलास जाधव, कार्याध्यक्ष डॉ. संदीप जगताप, उपाध्यक्ष अॅड. योगेश ढाेबळे, सचिव बळीराम राठोड, सहसचिव अक्षय सोनवणे, कोषाध्यक्ष प्रताप वाघमारे, सदस्य विलास काकडे, प्रमोद साळुंके, पवन घुगे, योगेश पवार.
शहर – अध्यक्ष अरुण भोसले, उपाध्यक्ष बाबुराव पारखे, सचिव मुकेश बनकर, सहसचिव आशिष लकडे, कोषाध्यक्ष नीलेश घोंगडे, सदस्य विशाल आहिरे, संदीप साखरे, अनिल ठोंबरे, रोहित केतकर, जितू चंदनसे, मिथुन जाधव.

कराटेच्या विकासाठी सर्वांना एका छताखाली आणणार : गाडे
राज्यात व देशात आमच्या संघटनेला मान्यता मिळाली आहे. आम्ही सर्व संबंधीत विभागांशी पत्र व्यवहार केला आहे. आगामी काळात राज्यात एकाच छत्राखाली सर्व कराटे संघटना, प्रशिक्षक, खेळाडू, पंचांना एकत्र आणून खेळाच्या विकासाठी काम करणार आहोत. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा व व्यासपीठ मिळवून देण्याच्या आमचा प्रयत्न राहिल. जिल्हा संघटनेला आवश्यक ती तांत्रिक, आर्थिक मदत आम्ही करणार आहोत, असे महाराष्ट्राचे सचिव संदीप गाडे यांनी म्हटले.

Tags: Aurangabad District Sports Karate AssociationPresident of the Karate Association
ShareTweetSend
Next Post

अश्विनने शमीसोबत जे केले ते एकदा पहाच

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.