• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित

by pravin
September 23, 2021
in अन्य खेळ, राष्ट्रीयस्तरीय, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद-कॉर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व हिमाचलप्रदेश कॉर्फबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, 19व्या फेडरेशन कप  राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद वरिष्ठ गटांच्या स्पर्धेचे आयोजन येत्या दिनांक 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर ते २०२१ तारखेदरम्यान कुलु, हिमाचालप्रदेश, येथे करण्यात आले आहे.

कर्फबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने 19व्या फेडरेशन कप  राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नवीन पद्धतीने व खेलो इंडिया स्पर्धेच्या धर्तीवर देशातील अव्वल आठ राज्याच्या कॉर्फबॉल संघांची निवड करून त्यांच्यामध्ये साखळी व नंतर बाद पद्धतीने स्पर्धा खेळविली जाणार आहे व ती सर्व खेळाडूंना पर्वणीच ठरणार आहे.

त्या अनुषंगाने 19व्या फेडरेशन कप  राष्ट्रीय कॉर्फबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या सहभागासाठी  महाराष्ट्राच्या राज्याच्या संघाची पी. सी. महाविद्यालय, बारामती, येथे महाराष्ट्र राज्य कॉर्फबॉल संघटनेचे सचिव श्री प्रवीण मानवतकर यांनी  घोषणा केली, त्यात औरंगाबाद जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील यांची संघात निवड करण्यात आली असून राज्याच्या संघासोबत चौघेही पुणेमार्गे कुलु, हिमाचलप्रदेश, येथे स्पर्धेच्या सहभागासाठी २8 सप्टेंबर 2021 रोजी संघासोबत रवाना होत आहेत.

आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील  हे एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे  राष्ट्रीय खेळाडू असून त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.खेळाडू असून मागील राष्ट्रीय स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या संघाने दुसरे स्थान पटकावले होते व यावेळी देखील  राज्याला चौघांकडून खूप अपेक्षा आहेत.

आंतरराष्ट्रीय खेळाडू विपुल कड, राष्ट्रीय कॉर्फबॉल खेळाडू सिद्धी सेठी, भूमी कपूर व गौरी पाटील यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र कॉर्फबॉल असोसिएशनचे सचिव  प्रवीण मानवतकर, संघ निवड समितीचे अध्यक्ष अतूल खोमणे, अशोक देवकर, प्रशिक्षक डॉ. गौतम जाधव, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्री हेमंत पातुरकर, जिल्हा कॉर्फबॉल संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, सचिव गणेश कड, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ उदय डोंगरे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त  डॉ. मकरंद जोशी, प्राचार्या शशिकला निलवंत, सय्यद रफिक, ज्योती दांडगे, मंदा कड, प्रशांत बुरांडे, विश्वास कड, सचिन तत्तापुरे आदींनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले आहे.

 

 

महाराष्ट्र राज्याचा संघ पुढील प्रमाणे,

 

मुले, विपूल कड, श्रेयस शेवते, दिशान गांधी, प्रणव खोमणे, श्रीप्रसाद पांढरे, संदेश पवार, रुणाल मालुसरे, तुषार वाळुंजे

 

 

मुली, कर्णधार पूजा पांढरे, सिद्धी सेठी, भूमी कपूर, गौरी पाटील, निशा पांडिया, शरयू जगताप, दृष्टी चव्हाण, दीप्ती पखाले

Tags: Corfball
ShareTweetSend
Next Post

गोलंदाज, त्रिपाठी व अय्यरच्या झंझावाताने कोलकाता ने मुंबईला एक तर्फी सामन्यात हरविले.

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.