• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ,पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम आणि स्मृती देऊन सन्मानित

स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश

by pravin
October 15, 2024
in पुरस्कार, बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस ,पवार यांच्या हस्ते ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम आणि स्मृती देऊन सन्मानित
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई (प्रतिनिधी):  पॅरिस आणि फ्रान्स येथे 2024 मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

सोमवार रोजी सह्याद्री अतिथीगृहात येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनाचे आयुक्त सुरज मांढरे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांची उपस्थिती होती.

पॅरीस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मिटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या महाराष्ट्र राज्याच्या या खेळाडूंचा व श्री. कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांचा, आज राज्य शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाने नुकत्याच आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पाश्वभुमीवर पॅरीस, ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना २० लक्ष रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास ३ कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण ३० लक्ष रुपये चा धनादेश व सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे बुडापेस्ट, हंगेरी येथे दि.१० ते २३ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत झालेल्या ४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात १९३ व १८१ देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघात राज्याचे बुद्धीबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होता, या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख १ कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी १० लक्ष रुपये इतकी रक्कम व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले आहे.

विदीत गुजराथी स्पर्धेकरिता विदेशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांचे वडील डॉ. संतोष गुजराथी यांनी तर अभिजीत कुंटे यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मेघना कुंटे आणि संकल्प गुप्ता यांच्यावतीने त्यांचे वडील संदीप गुप्ता यांनी सन्मान स्वीकारला.

Tags: Abhijit KunteChief Minister Eknath ShindeDeputy Chief Minister Ajit PawarDeputy Chief Minister Devendra FadnavisDivya DeshmukhOlympic medalists honored with cashOP GuptaSachin KhilariSankalp GuptaSports and Youth Services Commissioner Suraj MandreSuhas Patil (Divisional Deputy Director of Sports Aurangabad)Swapnil KusaleVidit Gujarathi
ShareTweetSend
Next Post
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.