• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी “राज्य क्रीडा दिन”

by pravin
January 1, 2024
in अन्य खेळ, बातम्या
Reading Time: 1 min read
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी "राज्य क्रीडा दिन"
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई: ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच १५ जानेवारी हा दरवर्षी “राज्याचा क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह व राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

मंत्री श्री बनसोडे म्हणाले,भारताला पहिले वैयक्क्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, याकरिता त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून प्रति वर्षी सर्वंत्र साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्हयास पुर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहास १ लाख रुपये असे एकुण २ लाख २५ हजार सुधारीक अनुदान देण्याचा शुक्रावारी (ता.२९) शासन निर्णय काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमीसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री बनसेडे यांनी सांगितले. तसेच पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा वितरण संमारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाशाबा जाधव यांचा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात भरीव अनुदान उपलब्ध करुन दिले त्यामुळे यांचे मंत्री बनसोडे यांनी आभार व्यक्त केले.

राज्य क्रीडा दिनास विविध कार्यक्रमाचे आयोजन :

क्रीडा व युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी केले आहे.

Tags: Maharashtra State Sports DayOlympian Khashaba Jadhav's Birthday 15th JanuarySports and Youth Welfare Minister Sanjay BansodeSports Week and National Sports Day
ShareTweetSend
Next Post

व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट; स्टेपिंग स्टोन, वुडरिज संघ दुसऱ्या सामन्यात विजयी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.