• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 19, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

आता महिला कुस्तीपटूंचीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार

by pravin
March 24, 2022
in कुस्ती, स्पर्धा
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आपल्या राज्याला आणि देशाला कुस्तीची मोठी परंपरा लाभली आहे. देशातल्या अनेक दिग्गज मल्लांनी जगाच्या पाठीवर आपले नाव कोरले आहे. याच कुस्तीने भारताला चक्क ऑलिंपिकमध्येही अनेक पदकं जिंकून दिली आहेत. या खेळात आधी फक्त पुरुषांचा वट असायचा. मात्र, इतर क्षेत्रांसारखं या कुस्तीतही महिलांनी त्यांचा दम दाखवला आहे. देशातील कानाकोपऱ्यातून अनेक मुली कुस्तीकडे वळत आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. १९६९ सालापासून ‘महाराष्ट्र केसरी‘ ही स्पर्धा सुरू झालीये. यामध्ये फक्त पुरुषांचा सहभाग पाहायला मिळतो. मात्र, आता हे चित्र बदलताना दिसणार आहे. महिलांचा कुस्तीत सहभाग वाढावा यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सोलापुरात मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा महिलांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

‘या’ ठिकाणी होणार महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा
आता महाराष्ट्रात पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसोबतच महिलांच्याही स्पर्धा भरवल्या जाणार असल्याचे दिपाली सय्यद  सोलापूर येथे म्हणाल्या. आता पनवेलमध्ये पहिली ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ भरवणार असल्याचीही घोषणा अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केली. ही कुस्ती स्पर्धा डीबीएस रेस्टलिंग फाऊंडेशनतर्फे भरवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

“महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पुरुषांसाठी अनेक स्पर्धा आहेत. मात्र, महिलांसाठी नाहीयेत. त्यामुळे त्यांनाही समान संधी मिळण्याची गरज आहे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी महिलांसाठी मॅट आणि माती या दोन्ही प्रकारच्या कुस्तीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही सांगितले.

पुरुष मल्लांप्रमाणे महिला मल्लांनीही आपल्या देशाला पदके मिळवून दिली आहेत. हरियाणातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि तिच्या इतर फोगाट बहिणींच्या आयुष्यावर थेट सिनेमेही बनवण्यात आले आहेत. त्यात ‘दंगल’ या सिनेमाचा समावेश आहे. यामुळे मुलींचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून मोठ्या प्रमाणात मुली या खेळाकडे वळत आहेत. अशात ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकते.

 

Tags: Deepali SayedMaharashtra Kesari tournamentNow the women's wrestlers will also be theSolapur
ShareTweetSend
Next Post

भारताविरुद्ध एकमात्र कसोटी अर्धशतक करणाऱ्या खेळाडूवर डोपिंग प्रकरणात बंदी

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.